बुलडाण्याच्‍या मनिष मेडिकलमधून गर्भपाताच्‍या औषधीचा साठा जप्‍त

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे, अन्न व औषध प्रशासन आयुक्त यांच्या निर्देशानुसार एमटीपी ड्रग मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत जिल्हाभरात एमटीपी ड्रग (गर्भपाताची औषधी) तपासणी करण्यात येत आहे. ज्यामुळे भ्रूणहत्या रोखण्यास मदत मिळणार आहे. या मोहिमेनुसार आतापर्यंत जिल्हाभरात २० औषध विक्रेते व डॉक्टर्सच्या पेढ्यांची …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे, अन्न व औषध प्रशासन आयुक्त यांच्या निर्देशानुसार एमटीपी ड्रग मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत जिल्हाभरात एमटीपी ड्रग (गर्भपाताची औषधी) तपासणी करण्यात येत आहे. ज्यामुळे भ्रूणहत्या रोखण्यास मदत मिळणार आहे. या मोहिमेनुसार आतापर्यंत जिल्हाभरात २० औषध विक्रेते व डॉक्टर्सच्या पेढ्यांची तपासणी करण्यात आली आहे. तपासणीत १२ जुलै रोजी बुलडाणा शहरातील जांभरून रस्त्यावरील मे. मनिष मेडिकल ॲन्‍ड जनरल स्टोअर्स या औषध पेढीची सापळा रचून तपासणी केली. या ठिकाणी एमटीपी ड्रग अंतर्गत गेस्टाप्रो टेबलेट नामक औषध साठा आढळला आहे. तो जप्त करण्यात आला आहे. या साठ्याच्या खरेदी विक्री बिला संदर्भात तपास करण्यात येत असून त्याअनुषंगाने कारवाई करण्यात येत आहे. जिल्ह्यात औषध विक्रेत्यांनी विना प्रिस्क्रीप्शन एमटीपी ड्रग विक्री करू नये. इतर कोणीही एमटीपी ड्रग अवैधरित्या विक्री अथवा साठा करू नये. विक्री करताना आढळल्यास संबंधितांविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. ही कारवाई सह आयुक्त यु. बी घरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त अ. तु बर्डे व औषध निरीक्षक गजानन घिरके यांनी केली आहे, असे सहायक आयुक्त श्री. बर्डे यांनी प्रसिद्ध पत्रकान्वये केले आहे.