गळफास घेऊन युवकाची आत्महत्या; बुलडाणा तालुक्यातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गळफास घेऊन ३५ वर्षीय युवकाने आत्महत्या केली. ही घटना आज, २६ जुलैला साखळी बुद्रूक येथे उघडकीस आली. मंगल बाळूभाऊ लवंगे (रा. साखळी बुद्रूक ता. बुलडाणा) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. मंगल भूमिहीन असून, गावातच मजुरीचे काम करत होता. सकाळी नऊला त्याने राहत्या घरात गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच बुलडाणा …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गळफास घेऊन ३५ वर्षीय युवकाने आत्महत्या केली. ही घटना आज, २६ जुलैला साखळी बुद्रूक येथे उघडकीस आली.

मंगल बाळूभाऊ लवंगे (रा. साखळी बुद्रूक ता. बुलडाणा) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. मंगल भूमिहीन असून, गावातच मजुरीचे काम करत होता. सकाळी नऊला त्याने राहत्या घरात गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच बुलडाणा ग्रामीण पोलीस घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. वृत्त लिहीपर्यंत मंगलच्या आत्महत्येचे कारण समोर येऊ शकले नाही. याप्रकरणाचा तपास बुलडाणा ग्रामीण पोलीस स्टेशनचे एएसआय रवींद्र वानखेडे करत आहेत.