गळफास घेऊन विवाहितेची आत्महत्या;खामगाव शहरातील घटना

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ३५ वर्षीय विवाहितेने राहत्या घरी गळफास घेतला. ही घटना आज, १० ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहाला खामगाव शहरातील शिवाजीनगर भागात समोर आली. सौ. रीना नरेंद्र काळे (रा. शिवाजीनगर, खामगाव) असे महिलेचे नाव आहे. घटनेवेळी घरात तिच्याशिवाय कुणीही नव्हते. तिने घरातील पंख्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. कुटुंबियांच्या लक्षात येताच तिला खामगावच्या सामान्य …
 
गळफास घेऊन विवाहितेची आत्महत्या;खामगाव शहरातील घटना

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ३५ वर्षीय विवाहितेने राहत्या घरी गळफास घेतला. ही घटना आज, १० ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहाला खामगाव शहरातील शिवाजीनगर भागात समोर आली.

सौ. रीना नरेंद्र काळे (रा. शिवाजीनगर, खामगाव) असे महिलेचे नाव आहे. घटनेवेळी घरात तिच्‍याशिवाय कुणीही नव्‍हते. तिने घरातील पंख्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. कुटुंबियांच्या लक्षात येताच तिला खामगावच्या सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. वृत्त लिहीपर्यंत आत्महत्येचे नेमके कारण समोर येऊ शकले नाही.