गळफास घेऊन वृद्धेची आत्‍महत्‍या; खामगाव तालुक्‍यातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः 56 वर्षीय विवाहित महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज, 1 जूनला पहाटे शिराळा(ता. खामगाव) येथे उघडकीस आली. शोभा ओंकार शिंदे (56, रा. शिराळा ता. खामगाव) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. शोभा शिंदे यांचे पती ओंकार शिंदे झोपेतून उठले असता त्यांना पत्नीने गळफास घेतल्याचे लक्षात आले. …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः 56 वर्षीय विवाहित महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली. ही घटना आज, 1 जूनला पहाटे शिराळा(ता. खामगाव) येथे उघडकीस आली. शोभा ओंकार शिंदे (56, रा. शिराळा ता. खामगाव) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.

शोभा शिंदे यांचे पती ओंकार शिंदे झोपेतून उठले असता त्यांना पत्‍नीने गळफास घेतल्याचे लक्षात आले. मध्यरात्रीदरम्यान घरातील सर्व जण झोपलेले पाहून त्यांनी घरातील टिनाच्या खांबाला गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच हिवरखेड पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. वृत्त लिहीपर्यंत आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही.