गळफास बांधतानाचे शूटिंग करून ते स्‍टेटसला ठेवले अन्‌ केली आत्‍महत्‍या!; देऊळगाव साकर्शातील धक्‍कादायक घटना

मेहकर (अनिल मंजुळकर ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः स्वतःच्या शेतात निंबाच्या झाडाला गळफास बांधताना मोबाइलवर शूटिंग करून, त्यानंतर मोबाइलचा कोड सांगून २१ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना देऊळगाव साकर्शा (ता. मेहकर) येथे १० जुलैला सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. मिलिंद बाळू जाधव (रा. देऊळगाव साकर्शा) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. आई-वडिलांना शेतातून घरी सोडल्यानंतर …
 

मेहकर (अनिल मंजुळकर ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः स्वतःच्या शेतात निंबाच्‍या झाडाला गळफास बांधताना मोबाइलवर शूटिंग करून, त्‍यानंतर मोबाइलचा कोड सांगून २१ वर्षीय तरुणाने आत्‍महत्‍या केल्याची धक्‍कादायक घटना देऊळगाव साकर्शा (ता. मेहकर) येथे १० जुलैला सायंकाळी सहाच्‍या सुमारास घडली.

मिलिंद बाळू जाधव (रा. देऊळगाव साकर्शा) असे आत्‍महत्‍या केलेल्या तरुणाचे नाव आहे. आई-वडिलांना शेतातून घरी सोडल्यानंतर पुन्‍हा तो शेतात गेला. तिथे निंबाच्‍या झाडाला नायलॉन दोरीने गळफास बांधत व्हिडिओ शूटिंग केले. त्‍यातच मोबाइलचा कोडही सांगितला. त्‍यानंतर हे शूटिंग त्‍याने स्‍टेटसवर ठेवून गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली. त्‍याचे स्‍टेटस गावातील राहुल चव्‍हाण व वैभव चव्हाण यांनी पाहताच त्‍यांनी तातडीने त्‍याच्‍या घरच्यांना कळवत शोध सुरू केला. शोधाशोध केल्यानंतर शेतातील निंबाच्‍या झाडाला तो लटकलेला दिसला. जानेफळ पोलिसांना माहिती मिळताच ते घटन्‍ाास्‍थळी आले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. या घटनेप्रकरणी गजानन सूर्यभान जाधव (५०, रा. देऊळगाव साकर्शा) यांच्‍या फिर्यादीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्‍यूची नोंद केली आहे. पोलीस उपनिरीक्षक श्री. काकडे यांच्यासह इर्शाद पटेल व विनोद फुफाटे अधिक तपास करत आहेत.