गळा, खांद्यावर जखमा असलेला युवकाचा मृतदेह आढळला!; खामगाव तालुक्‍यातील घटना, आधारकार्डवरून पटली ओळख

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : खामगाव -चिखली रोडवरील गारडगाव शिवारात आज, २५ सप्टेंबरला दुपारी १ च्या सुमारास ३५ वर्षीय युवकाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळल्याने एकच खळबळ उडाली. टेकडीच्या पायथ्याशी जाऊन बुलडाणा ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. मृतदेहाच्या खिशात सापडलेल्या आधारकार्डवरून मृतदेह संतोष श्रीकृष्ण टवरे (३५, रा. एकलारा, ता. संग्रामपूर) याचा असल्याचे समोर आले. याची माहिती …
 
गळा, खांद्यावर जखमा असलेला युवकाचा मृतदेह आढळला!; खामगाव तालुक्‍यातील घटना, आधारकार्डवरून पटली ओळख

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : खामगाव -चिखली रोडवरील गारडगाव शिवारात आज, २५ सप्‍टेंबरला दुपारी १ च्‍या सुमारास ३५ वर्षीय युवकाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळल्याने एकच खळबळ उडाली.

टेकडीच्या पायथ्याशी जाऊन बुलडाणा ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. मृतदेहाच्या खिशात सापडलेल्या आधारकार्डवरून मृतदेह संतोष श्रीकृष्ण टवरे (३५, रा. एकलारा, ता. संग्रामपूर) याचा असल्याचे समोर आले. याची माहिती मृत व्यक्तीच्या नातेवाइकांना देण्यात आली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खामगाव सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला. मृतदेहाच्या गळ्यावर आणि खांद्यावर किरकोळ जखमा आहेत. तपास खामगाव ग्रामीण पोलीस करीत आहेत.