गस्‍त घालणारे वन कर्मचारी ‘ते’ दृश्य पाहताच हादरले!

जानेफळ (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पाथर्डी घाटात (ता. मेहकर) कुजलेला पुरुषाचा मृतदेह 18 मार्चला सायंकाळी सहाच्या सुमारास आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. घातपाताचा संशय असून, त्यादृष्टीने जानेफळ पोलीस तपास करत आहेत. वन विभागाच्या तपासणी नाक्यापासून 100 मीटर अंतरावर हा मृतदेह आढळला. अंदाजे 50 वर्षीय पुरुषाचा हा मृतदेह आहे. वनरक्षक वसंत फुके, वनमजूर वसुदेव राज हे …
 

जानेफळ (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः पाथर्डी घाटात (ता. मेहकर) कुजलेला पुरुषाचा मृतदेह 18 मार्चला सायंकाळी सहाच्‍या सुमारास आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. घातपाताचा संशय असून, त्‍यादृष्टीने जानेफळ पोलीस तपास करत आहेत.

वन विभागाच्‍या तपासणी नाक्‍यापासून 100 मीटर अंतरावर हा मृतदेह आढळला. अंदाजे 50 वर्षीय पुरुषाचा हा मृतदेह आहे. वनरक्षक वसंत फुके, वनमजूर वसुदेव राज हे गस्‍त घालत असताना त्‍यांना दुर्गंधी आल्याने त्‍यांनी जाऊन पाहिले असता मृतदेह दिसला. त्‍यांनी तातडीने वनपरिक्षेत्र अधिकारी प्रल्हाद तोंडीलायता व वनपाल संदीप परिहार यांना याची माहिती दिली. त्‍यांनी जानेफळ पोलिसांना कळवले. ठाणेदार राहुल गोंधे व त्‍यांच्‍या सहकाऱ्यांनी घटनास्‍थळी येऊन पाहणी केली. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. अंगात पांढरा शर्ट, निळी पँट, तोंडाला व गळ्याला पांढरा रूमाल, डाव्‍या हातात घड्याळ, उजव्‍या हातात पिवळ्या धातूचा कडा, बाजूलाच चप्पल पडलेली होती.