गहू, ज्वारी, हरभरा, मका खरेदीचे चुकारे शेतकऱ्यांच्या खात्‍यात जमा

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत राज्य शासनातर्फे हमी दराने मका, ज्वारी व गहू शेतमालाची खरेदी करण्यात आली होती. यात आतापर्यंत 193 शेतकऱ्यांकडून 8647.90 क्विंटल मका खरेदी करण्यात आली आहे. या खरेदीपोटी शेतकऱ्यांचे 1 कोटी 58 लक्ष रुपयांचे चुकारे खात्यामध्ये जमा करण्यात आले आहे. जिल्ह्यात 1778 शेतकऱ्यांकडून 31691.39 क्विंटल …
 
गहू, ज्वारी, हरभरा, मका खरेदीचे चुकारे शेतकऱ्यांच्या खात्‍यात जमा

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत राज्य शासनातर्फे हमी दराने मका, ज्वारी व गहू शेतमालाची खरेदी करण्यात आली होती. यात आतापर्यंत 193 शेतकऱ्यांकडून 8647.90 क्विंटल मका खरेदी करण्यात आली आहे. या खरेदीपोटी शेतकऱ्यांचे 1 कोटी 58 लक्ष रुपयांचे चुकारे खात्यामध्ये जमा करण्यात आले आहे. जिल्ह्यात 1778 शेतकऱ्यांकडून 31691.39 क्विंटल ज्वारीची खरेदी करण्यात आली. या खरेदीपाटी देय असलेली 8 कोटी 26 लक्ष रुपये त्‍यांच्‍या खात्‍यात जमा करण्यात आले. 20 शेतकऱ्यांकडून 486.25 क्विंटल गहू खरेदी केला होता. या खरेदीपोटी 12 लक्ष 73 हजार रुपये त्‍यांच्‍या खात्‍यात जमा करण्यात आले. मका, ज्वारी व हरभरा खरेदी केलेल्या शेतकऱ्यांचे चुकारे ऑनलाईन पोर्टलद्वारे 24 ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले आहे. तसेच या योजनेतंर्गत नाफेड मार्फत 10 हजार 950 शेतकऱ्यांची हरभरा खरेदी 189551.71 क्विंटल करण्यात आली. या खरेदीचे 96 कोटी 67 लाख रुपयेसुद्धा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहे, असे जिल्हा पणन अधिकारी पी. एस. शिंगणे यांनी कळविले आहे.