गांगलगावचा गजानन अंभोरे चिखलीत फिरत होता संशयास्पद!

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अंधारात दबा धरून बसलेल्या व्यक्तीला चिखली पोलिसांनी ताब्यात घेतले. चोरी करण्याच्या उद्देशाने तो लपून बसला असावा, या संशयावरून त्याला पकडून विचारणा केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर स्वतःची ओळख सांगितली. गजानन ओंकार अंभोरे (३८) असे त्याचे नाव असून, तो चिखली तालुक्यातील गांगलगावचा आहे. सहायक पोलीस निरिक्षक अमोल बारापात्रे, …
 
गांगलगावचा गजानन अंभोरे चिखलीत फिरत होता संशयास्पद!

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अंधारात दबा धरून बसलेल्या व्‍यक्‍तीला चिखली पोलिसांनी ताब्‍यात घेतले. चोरी करण्याच्‍या उद्देशाने तो लपून बसला असावा, या संशयावरून त्‍याला पकडून विचारणा केली असता त्‍याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्‍यानंतर स्वतःची ओळख सांगितली. गजानन ओंकार अंभोरे (३८) असे त्‍याचे नाव असून, तो चिखली तालुक्‍यातील गांगलगावचा आहे.

सहायक पोलीस निरिक्षक अमोल बारापात्रे, चालक एएसआय मोहम्मद अशपाक आणि ना.पो.काँ. सदानंद मुरलिधर चापले हे काल रात्री ते आज पहाटेपर्यंत पेट्रोलिंग करत होते. चिखली शहरातील डी.पी. रोडने पेट्रोलिंग करताना पावणेअकराच्‍या सुमारास गुप्त बातमीदाराने त्‍यांना माहिती दिली की अंगात पिवळे टीशर्ट, जीन्स-पँट घातलेला व्‍यक्‍ती पारधी बाबा मंदिराजवळ संशयास्पदरित्‍या फिरत आहे. त्‍यामुळे पोलिसांनी पारधी बाबा मंदिराजवळ जाऊन अंधारात शेडच्या आडोशाला लपून बसलेल्या गजाननला ताब्‍यात घेतले. चौकशी केली असता सुरुवातीला उडवाउडवीचे उत्तरे देऊ लागला. कसून चौकशी केली असता त्‍याने स्वतःची ओळख सांगितली. दरम्यान, गांगलगावचे सामाजिक कार्यकर्ते के. टी. म्‍हस्‍के यांनी बुलडाणा लाइव्हला संपर्क करून गजानन अंभोरे नावाचा कुणी व्यक्‍ती गावात राहत नसल्याचे सांगितले.