गांजा तस्करी ः आरोपीची 7 दिवस पोलीस कोठडीत रवानगी

मलकापूर (गजानन ठोसर) ः इनोव्हा, इर्टिका कारमधून सात क्विंटल गांजा मलकापूरकडून बोदवडकडे जात असताना मलकापूर ग्रामीण पोलिसांनी काल, 9 मार्चला पहाटे पकडला होता. यातील आरोपी नवीनरेड्डी सोमीरेड्डी (37, रा. शहापूरनगर संजय गांधीनगर जिल्हा मेडचल, तेलंगणा) यास पोलिसांनी अटक केली होती. त्याच्या ताब्यातील दोन्ही गाड्या व सात क्विंटल गांजा असा एकूण एक कोटी दहा लक्ष रुपयांचा …
 

मलकापूर (गजानन ठोसर) ः इनोव्हा, इर्टिका कारमधून सात क्विंटल गांजा मलकापूरकडून बोदवडकडे जात असताना मलकापूर ग्रामीण पोलिसांनी काल, 9 मार्चला पहाटे पकडला होता. यातील आरोपी नवीनरेड्डी सोमीरेड्डी (37, रा. शहापूरनगर संजय गांधीनगर जिल्हा मेडचल, तेलंगणा) यास पोलिसांनी अटक केली होती. त्‍याच्या ताब्यातील दोन्ही गाड्या व सात क्विंटल गांजा असा एकूण एक कोटी दहा लक्ष रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. दरम्यान आरोपीचे तिघे साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले, होते. आरोपी नवीन रेड्डीला न्यायालयासमोर हजर केले असता 16 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तपास मलकापूर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अनिल बेहराणी करीत आहेत.