गाईच्‍या कृत्रिम रेतनासाठी जास्तीचे पैसे मागणाऱ्या अधिकाऱ्याला शेतकऱ्याने अशी घडवली अद्दल!; बुलडाणा तालुक्‍यातील घटना, सीईओंनी केले निलंबित

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गाईचे कृत्रिम रेतन करण्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा अधिकचे पैसे मागणाऱ्या हतेडी येथील पशुधन पर्यवेक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी ही निलंबनाची कारवाई केली आहे. अंभोडा (ता. बुलडाणा) येथील शेतकरी गुलाबराव पवार यांच्या गाईचे कृत्रिम रेतन करण्यासाठी हतेडी येथील पशुधन केंद्राचे पर्यवेक्षक डॉ. …
 
गाईच्‍या कृत्रिम रेतनासाठी जास्तीचे पैसे मागणाऱ्या अधिकाऱ्याला शेतकऱ्याने अशी घडवली अद्दल!; बुलडाणा तालुक्‍यातील घटना, सीईओंनी केले निलंबित

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गाईचे कृत्रिम रेतन करण्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा अधिकचे पैसे मागणाऱ्या हतेडी येथील पशुधन पर्यवेक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी ही निलंबनाची कारवाई केली आहे.

अंभोडा (ता. बुलडाणा) येथील शेतकरी गुलाबराव पवार यांच्या गाईचे कृत्रिम रेतन करण्यासाठी हतेडी येथील पशुधन केंद्राचे पर्यवेक्षक डॉ. वसंत हांगे यांनी जास्तीचे पैसे मागितले होते. त्याचा व्हिडिओ स्वतः शेतकरी गुलाबराव पवार यांनी शूट केला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर “सीईओ’ भाग्यश्री विसपुते यांनी गंभीर दखल घेतली. प्रकरणाची चौकशी व पुढील आदेश येईपर्यंत डॉ. हांगे यांना निलंबित करण्यात आले. शेतकऱ्याच्‍या हुशारी व साहसाचे कौतुक होत असून, कर्तव्य विसरलेल्या अधिकाऱ्यांना अशाच प्रकारे सर्वांसमोर आणले पाहिजेत, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.