गाई-म्हशींसाठी गोठा कसा बांधावा?

गोठा बांधताना शेतातील उंचावर असलेली कठीण व सपाट जागा निवडावी. जेणेकरून गोठ्यातील मलमूत्र, सांडपाणी यांची विल्हेवाट व्यवस्थित लावता येईल. चार्यासाठी योग्य प्रकारची गव्हाण आणि प्रत्येक जनावरास हालचालीसाठी पुरेशी जागा मिळेल याची काळजी घ्यावी. गोठ्याचे छत योग्य उंचीवर आणि न गळणारे असावे. गोठ्यात भरपूर सूर्यप्रकाश व हवा खेळती राहील अशी व्यवस्था असावी. गोठ्यातील गटार, गव्हाण व …
 

गोठा बांधताना शेतातील उंचावर असलेली कठीण व सपाट जागा निवडावी. जेणेकरून गोठ्यातील मलमूत्र, सांडपाणी यांची विल्हेवाट व्यवस्थित लावता येईल. चार्‍यासाठी योग्य प्रकारची गव्हाण आणि प्रत्येक जनावरास हालचालीसाठी पुरेशी जागा मिळेल याची काळजी घ्यावी. गोठ्याचे छत योग्य उंचीवर आणि न गळणारे असावे. गोठ्यात भरपूर सूर्यप्रकाश व हवा खेळती राहील अशी व्यवस्था असावी. गोठ्यातील गटार, गव्हाण व जनावरांना उभे राहण्याच्या जागेवर भरपूर सूर्यप्रकाश येण्यासाठी शक्यतो लांबीच्या बाजूने गोठा दक्षिण-उत्तर दिशेस असावा. गोठ्यातील जमिनी भाजलेल्या विटांच्या असाव्यात. जमिनीस गव्हाणीकडून उतार दिलेला असावा. जनावरांना योग्य पद्धतीने चारा खाता येईल या पद्धतीने गव्हाण बांधावी. गव्हाणीचा पृष्ठभाग गुळगुळीत आणि काठ गोलाकार असावा. गोठा हवेशीर राहील या पद्धतीने भिंतीचे बांधकाम करावे. गोठ्यातील छत वजनाने हलके, कठीण, टिकाऊ असावे. जनावरांना ताजे व स्वच्छ पाणी सदैव उपलब्ध राहण्यासाठी टाकी बांधावी. जनावरांचे शेण, मूत्र जमा करण्यासाठी गोठ्याच्या कडेने योग्य आकाराचे गटार करावे. गोठा बांधताना पशुतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

गोठा बांधण्याच्या पद्धती…

– शेपटीपुढे शेपटी पद्धत ः या पद्धतीत जनावरांना धुण्यासाठी व दूध काढण्यासाठी दोन्ही ओळींमधील जागा अधिक उपयोगी पडते. जनावरांचे तोंड बाहेरच्या बाजूस असल्याने संसर्गजन्य रोग होण्याची शक्यता कमी असते, तसेच बाहेरच्या बाजूने ताजी हवा मिळते. दूध काढणार्‍यांवर देखरेख करणे सोपे जाते. माजावरील जनावरे सहज ओळखता येतात. – तोंडाकडे तोंड पद्धत ः तोंडाकडे तोंड करून बांधलेल्या जनावरांचे योग्य पद्धतीने निरीक्षण करता येते. गोठ्याच्या दोन्ही बाजूस मोकळी जागा असल्यामुळे सूर्यप्रकाश भरपूर मिळतो. जनावरांना चारा टाकणे सोपे जाते. रोगप्रसार कमी प्रमाणात होतो.