गायब होण्याचे सत्र सुरूच… 2 दिवसांत 2 मुली गायब!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गेल्या महिन्यात 66 जण जिल्ह्यातून बेपत्ता झाले आहेत. या महिन्यातही हे बेपत्ता होण्याचे सत्र सुरू झाले असून, दोन दिवसांत दोन मुली गायब झाल्या आहेत. 1 मे रोजी कु. श्वेता गजानन भाग्यवंत ही 19 वर्षीय मुलगी देऊळगाव राजा शहरातील माळीपुऱ्यातून घरून कुणाला काही न सांगता निघून गेली आहे. आज, 2 मे …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः गेल्या महिन्यात 66 जण जिल्ह्यातून बेपत्ता झाले आहेत. या महिन्यातही हे बेपत्ता होण्याचे सत्र सुरू झाले असून, दोन दिवसांत दोन मुली गायब झाल्‍या आहेत.

1 मे रोजी कु. श्वेता गजानन भाग्‍यवंत ही 19 वर्षीय मुलगी देऊळगाव राजा शहरातील माळीपुऱ्यातून घरून कुणाला काही न सांगता निघून गेली आहे. आज, 2 मे रोजी मोनाली प्रमोद जैस्वाल ही 20 वर्षीय मुलगी मलकापूर तालुक्‍यातील दसरखेड येथील घरातून गायब झाली आहे. त्‍यांचा शोध घेतला जात आहे. त्‍यांच्‍या पालकांनी त्‍या हरवल्याची तक्रार अनुक्रमे देऊळगाव आणि एमआयडीसी मलकापूर पोलीस ठाण्यात दिली आहे.