गायी, म्हशींची उत्पादकता वाढविण्यासाठी अनुवांशिक सुधारणा कार्यक्रम; कालवडींना संगोपनार्थ प्रोत्साहनपर 5000 रुपयाचे व नर वासरांना 25000 रुपये अनुदान

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात गायी, म्हशींची उत्पादकता वाढविण्यासाठी सर्वसमावेशक अनुवांशिक सुधारणा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. सन २०२१-२२ या वर्षासाठी या योजनेत पशुपालकांनी सहभागी व्हावे. त्यासाठी दुधाळ जनावरांची नोंद नजिकच्या पशुवैद्यकीय संस्थेकडे करावे. तिथे विहित नमुन्यात माहिती भरून त्यांच्यामार्फत पशुसंवर्धन कार्यालयास प्रस्ताव त्वरीत सादर करावे, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. पी.जी. बोरकर यांनी …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात गायी, म्हशींची उत्पादकता वाढविण्यासाठी सर्वसमावेशक अनुवांशिक सुधारणा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. सन २०२१-२२ या वर्षासाठी या योजनेत पशुपालकांनी सहभागी व्हावे. त्‍यासाठी दुधाळ जनावरांची नोंद नजिकच्या पशुवैद्यकीय संस्थेकडे करावे. तिथे विहित नमुन्यात माहिती भरून त्यांच्यामार्फत पशुसंवर्धन कार्यालयास प्रस्ताव त्वरीत सादर करावे, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. पी.जी. बोरकर यांनी केले आहे.
नोंद झालेल्या दुधाळ जनावरांच्या पशुपालकाने एक एसएमएस केल्यास त्यांच्या दुधाळ जनावरांना लगेच नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत दुधाळ जनावराचे कृत्रिम रेतन केले जाते. कृत्रिम रेतन केल्यानंतर जन्मलेल्या कालवडींना संगोपनार्थ प्रोत्साहनपर 5000 रुपयाचे व नर वासरांना 25000 रुपये अनुदान देण्यात येते. या योजनेत समाविष्ठ होण्यासाठी अर्ज पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयास ३१ जुलैपर्यंत देण्यात यावे. जिल्ह्यातील सर्व पशुपालकांनी दुधाळ जनावरांची ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी. ही योजना पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येते. जिल्ह्यातील शेतकरी अथवा पशुपालकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. पी.जी. बोरकर यांनी केले आहे.