गावकऱ्यांनो ‘त्‍यांना’ आवरा अन्यथा तुमचे गाव कोरोनाच्या दाढेत गेलेच समजा!; गावागावात वाढलेत रुग्‍ण, बुलडाण्यात महिलेचा मृत्‍यू

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मधल्या काळात केवळ शहरीभागापुरता दिसणारा कोरोना आता ग्रामीण भागात सर्वत्र फैलावला असून, काही बेफिकिर लोकांमुळे तो अवघ्या गावाच्या जिवावर बेतू लागला आहे. आता सर्व गावकऱ्यांनीच एकत्र येऊन कोरोनाविषयी काळजी न घेणाऱ्यांना वठणीवर आणण्याची गरज आहे. तरच गावातून कोरोना हद्दपार होईल, अन्यथा गावच्या गाव कोरोनाच्या दाढेत गेलेच म्हणून समजा. गेल्या काही …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः मधल्या काळात केवळ शहरीभागापुरता दिसणारा कोरोना आता ग्रामीण भागात सर्वत्र फैलावला असून, काही बेफिकिर लोकांमुळे तो अवघ्या गावाच्‍या जिवावर बेतू लागला आहे. आता सर्व गावकऱ्यांनीच एकत्र येऊन कोरोनाविषयी काळजी न घेणाऱ्यांना वठणीवर आणण्याची गरज आहे. तरच गावातून कोरोना हद्दपार होईल, अन्यथा गावच्‍या गाव कोरोनाच्‍या दाढेत गेलेच म्‍हणून समजा. गेल्‍या काही दिवसांत असाच भयंकर प्रकार काही गावांत दिसून आला आहे. काल, 20 मार्चला कारेगावमध्ये तब्‍बल 37 रुग्‍ण आढळले होते, आज 21 मार्चला आणखी त्‍यात 2 रुग्‍णांची भर पडली. नांदुरा तालुक्‍यातील शिरसोळीत तब्‍बल 30 रुग्‍ण आढळले आहेत. दरम्‍यान, जिल्ह्यात आज 802 बाधितांची नव्याने भर पडली असून, 373 रुग्‍णांना बरे झाल्याने रुग्‍णालयातून डिस्‍चार्ज देण्यात आला आहे. बुलडाण्यातील सुंदरखेड भागातील जयनगरातील 70 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्‍यू झाल्‍याचेही समोर आले आहे.प्रयोगशाळेत तपासणीसाठी  पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 4047 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 3245 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 802 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील  456 व रॅपिड टेस्टमधील 346 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतून 733 तर रॅपिड टेस्टमधील 2512 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्‍ह आलेले अहवाल

बुलडाणा शहर : 111, बुलडाणा तालुका : सुंदरखेड 2, डोंगरखंडाळा 1,देऊळघाट 1, सागवान 3,  धाड 4,  माळवंडी 10, माळविहिर 2, नांद्राकोळी 2, येळगाव 2, गुम्मी 1, सातगाव 1, चांडोळ 1, सावळी 1, बिरसिंगपूर 1, इजलापूर 2, जनुना 11, पांगरी 1,  खामगाव शहर : 66,  खामगाव तालुका :  लाखनवाडा 1,  राहुड 1, चिंचपूर 1, टेंभुर्ण 5, पिंपळगाव राजा 1, आवार 1, पळशी 1, सुटाळा 3, लांजूड 1, अंत्रज 1, गवंधला 1, भंडारी 6,  नांदुरा तालुका :  शिरसोळी 30,  अवधा 1, धानोरा 1, वडनेर 3, चांदुरबिस्वा 3, डिघी 3, बरफगाव 7, विटाळी 6, टाकरखेड 1, शेंबा 1, वळती 1, खातखेड 1, खैरा 1, मेंढळी 1, काटी 1, हिंगणे गव्हाड 1,  मलकापूर शहर : 67, मलकापूर तालुका : उमाळी 1, आळंद 5, हरसोडा 1, कुंड खू 9,   चिखली शहर : 43,  चिखली तालुका :  अमोणा 2,  पेठ 10,  पळसखेड नाईक  1, किन्ही नाईक 3, अंत्री कोळी 1, अमडापूर 4, मेरा बुद्रूक 10, कटोडा 1, खैरव 1, भोरसा भोरसी 1, उंद्री 4, किन्होळा 1, केळवद 1, करवंड 2, शेलगाव जहाँगिर 1, एकलारा 1, अंबाशी 2, अंत्री खेडेकर 3, येवता 1, डोंगर शेवली 3, मलगी 4, मंगरुळ नवघरे 3, आमखेड 1, हातणी 1, सवणा 3, किन्ही सवडत 2, सावंगी गवळी 1, मलगणी 2, पिंपळगाव ठोसरे 1, वाघापूर 1, धोत्रा भनगोजी 1, पळसखेड दोलत 1,  सिंदखेड राजा शहर : 17, सिंदखेड राजा तालुका : दुसरबीड 2,  किनगाव राजा 4,  शेंदूर्जन 2, पिंपळगाव लेंडी 2, धोंडळगाव 2, खैरखेड 2, वडगाव खैरी 2, वर्दाडी 1, झोटिंगा 1, रताळी 1,  मोताळा तालुका :  डिडोळा बुद्रूक 3,  धामणगाव बढे 9, तालखेड 1, रोहिणखेड 2, चावरदा 1, तरोडा 1, शिरवा 1, शेलापूर 2, निपाना 1, काबरखेड 1, तपोवन 2, आव्हा 1, पिंपळगाव देवी 1, वाघजळ 2, खामखेड 3, थड 2, खडकी 2,  मोताळा शहर : 18, शेगाव शहर : 35, शेगाव तालुका : जवळा 1, जानोरी 1, संग्रामपूर तालुका : वानखेड 5, दुर्गादैत्य 6, जळगाव जामोद शहर : 6, जळगाव जामोद तालुका : आसलगाव 5, उमापूर 18, सावरगाव 1, देऊळगाव राजा शहर : 14, देऊळगाव राजा तालुका : अंढेरा 2,  देऊळगाव मही 1, वाकी 2, सिंनगाव जहाँगिर 2,  खैरव 2, असोला जहाँगीर 1, जवळखेड 1, उंबरखेड 1, लोणार शहर : 2, लोणार तालुका :  बिबी 10, खळेगाव 1, खंडाळा 1, कारेगाव 2, सुलतानपूर 1, हिवरखेड 1, शारा 3, गायखेड 1, चोर पांग्रा 1,  मेहकर शहर :8,  मेहकर तालुका :   देऊळगाव माळी 1, शहापूर 2, अकोला ठाकरे 3, जानेफळ 3, देऊळगाव वायसा 1, सावळा 7, ब्रह्मपुरी 5, लोणी गवळी 5, कल्याणा 1, ओझर 1, बोथा 1,  नांदुरा शहर :15, संग्रामपूर शहर :1,   मूळ पत्ता भोकरदन 1, लोहारा ता. बाळापूर 1, रावेर जि. जळगाव 1, नागपूर 1, जळगाव 1, अमरावती 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 802 रुग्ण आढळले आहे.

373 रुग्णांची कोरोनावर मात

आज 373 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. कोविड केअर सेंटरनुसार सुटी देण्यात आलेले रुग्‍ण असे ः बुलडाणा : अपंग विद्यालय 44, कोविड हॉस्पिटल 15, मुलींचे वसतिगृह 23, खामगाव : 73, देऊळगाव राजा : 29,  चिखली : 64, मेहकर : 28, लोणार : 14,  जळगाव जामोद : 17, सिंदखेड राजा : 3, मलकापूर : 60, मोताळा : 3.

5457 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार  सुरू

आजपर्यंत 183995 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 24414 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 4395 नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहे. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 183995 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 30107 कोरोनाबाधित रुग्ण असून, जिल्ह्यात सध्या  रुग्णालयात 5457 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 236 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

काय वाढतोय खेड्यांत कोरोना….?

अजूनही कोरोना या साथरोगाबद्दल गांभीर्य खेडेगावात आलेले नाहीत. ग्रामस्‍थ मास्‍क, सॅनिटायझर वापरणे तर दूरच पण सुरक्षित अंतरसुद्धा ठेवत नाहीत. कुठेही थुंकणे, अस्‍वच्‍छता पसरवणे या गोष्टी गावात जशा आधी सुरू होत्‍या तशा आजही सुरू आहेत. कोरोना शहराचा आजार आहे, खेड्यांत कुठे राहिला कोरोना असे म्‍हणून हलगर्जीपणा करणाऱ्या लोकांमुळे खेड्यांत पुन्‍हा कोरोनाचे संकट ओढावले आहे. आज जी आकडेवारी समोर आली ती बघता वेळीच सर्व ग्रामस्‍थांनी अशा बेफिकीर लोकांना आवरले नाही तर गाव संकटात येऊ शकते, एवढे नक्‍की.