गावगुंडाचा शेतकऱ्यावर खुनी हल्ला!; प्रकृती चिंताजनक, नांदुरा तालुक्‍यातील घटना

नांदुरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गावगुंडाने केलेल्या खुनी हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाला असून, त्याला आधी गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि नंतर मलकापूरला रुग्णालयात हलवले आहे. ही घटना काल, 7 जूनला सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. फुलंदास पंढरी सातव (42) असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. ते पत्नी व मुलाबाळासह राहतात. डिगांबर रमेश निखाळे (35) असे आरोपीचे …
 
गावगुंडाचा शेतकऱ्यावर खुनी हल्ला!; प्रकृती चिंताजनक, नांदुरा तालुक्‍यातील घटना

नांदुरा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः गावगुंडाने केलेल्या खुनी हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाला असून, त्‍याला आधी गावातील प्राथमिक आरोग्‍य केंद्र आणि नंतर मलकापूरला रुग्‍णालयात हलवले आहे. ही घटना काल, 7 जूनला सायंकाळी साडेसातच्‍या सुमारास घडली.

फुलंदास पंढरी सातव (42) असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. ते पत्‍नी व मुलाबाळासह राहतात. डिगांबर रमेश निखाळे (35) असे आरोपीचे नाव आहे. तो दारू पिऊन गावात दादागिरी करत असतो. लोकांसोबत विनाकारण वाद घालतो. काल फुलंदास सातव हे घराजवळच्या संतोष सातव यांच्‍या किराणा दुकानासमोर उभे असताना मागून डिगांबर रमेश निखाडे आला. त्याने हातातील दगड त्‍यांच्‍या डोक्यात मारला व शिविगाळ करू लागला. तू जर आता मेला नाही तर एखाद्या दिवशी जिवाने मारून टाकतो, अशी धमकी तो देऊ लागला. फुलंदास हे जमिनीवर कोसळले.

संतोष जगन्नाथ सातव, सचिन संतोष सातव, सुभाष मोरे, श्रीकृष्ण सातव यांनी फुलंदास यांचे भाऊ रामदास पंढरी सातव यांना घटनेची माहिती दिली. भावाने गजानन देशमुख व इतर लोकांच्‍या मदतीने फुलंदास यांना गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र जास्त मार असल्याने डॉक्टरांनी मलकापूर येथे हलविण्यास सांगितले. सध्या त्यांच्‍यावर दवाखान्यात उपचार सुरू आहे. रामदास सातव यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी डिगांबर निखाळे (रा. वडनेर भोलजी) याच्‍याविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.