गिरिश महाजन सकाळीच तो प्रस्ताव घेऊन हजारेंकडे!

नगर (लाइव्ह ग्रुप वृत्तसेवा) ः उच्चाधिकार समिती नियुक्त करण्याचा प्रस्ताव देऊन केंद्र सरकारने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे आंदोलन थोपविण्याचा प्रयत्न केला आहे. माजी मंत्री गिरीश महाजन प्रस्ताव घेऊन राळेगणसिद्धीत आज सकाळी आले होते. तिघांची समिती नेमून प्रस्तावावर अभ्यासासाठी आता हजारेंनी वेळ घेतली आहे. त्यानंतर आंदोलानासंबंधी पुढील भूमिका ते जाहीर करणार आहेत.गेल्या आठवड्यात विरोधी पक्ष …
 

नगर (लाइव्ह ग्रुप वृत्तसेवा) ः उच्चाधिकार समिती नियुक्त करण्याचा प्रस्ताव देऊन केंद्र सरकारने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे आंदोलन थोपविण्याचा प्रयत्न केला आहे. माजी मंत्री गिरीश महाजन प्रस्ताव घेऊन राळेगणसिद्धीत आज सकाळी आले होते. तिघांची समिती नेमून प्रस्तावावर अभ्यासासाठी आता हजारेंनी वेळ घेतली आहे. त्यानंतर आंदोलानासंबंधी पुढील भूमिका ते जाहीर करणार आहेत.
गेल्या आठवड्यात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी हजारे यांची भेट घेतली होती. हजारे यांची भेट घेतल्यानंतर गिरिश महाजन पत्रकारांशी बोलताना म्हणाले, की हजारे यांनी केलेल्या मागण्या केंद्र सरकारकडून मान्य होत आहेत. यावर त्यांचे समाधान होईल अशी अपेक्षा आहे. त्यांचे उत्तर आले की निर्णयाचा अंतिम मसुदा तयार केला जाईल. त्यांच्यावर आंदोलन करण्याची वेळ येणार नाही, असा विश्‍वास महाजन यांनी व्यक्त केला आहे.