गुंज, केसापूरमध्ये कोरोना बळी!; बाधितांचा आकडा जिल्ह्यात 22 हजार पार!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनाने आणखी 2 बळी घेऊन 203 चा आकडा गाठला आहे. उपचारादरम्यान गुंज (ता. सिंदखेड राजा) येथील 75 वर्षीय पुरुष व केसापूर (ता. बुलडाणा) येथील 64 वर्षीय पुरुष रूग्णाचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात नव्या 579 बाधितांची भर पडली असून, यामुळे एकूण आकडाही 22400 वर गेला आहे. दरम्यान, 392 रुग्णांनी कोरोनावर मात …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कोरोनाने आणखी 2 बळी घेऊन 203 चा आकडा गाठला आहे. उपचारादरम्यान गुंज (ता. सिंदखेड राजा) येथील 75 वर्षीय पुरुष व केसापूर (ता. बुलडाणा) येथील 64 वर्षीय पुरुष रूग्णाचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात नव्‍या 579 बाधितांची भर पडली असून, यामुळे एकूण आकडाही 22400 वर गेला आहे. दरम्‍यान, 392 रुग्‍णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्‍यांना डिस्‍चार्ज मिळाला आहे.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2464 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1885 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 579 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 520 व रॅपिड टेस्टमधील 59 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतून 1512 तर रॅपिड टेस्टमधील 373 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्ह आलेले अहवाल

शेगाव शहर : 57, शेगाव तालुका : माटरगाव 1, जानोरी 1, लासुरा 1, कालखेड 5, पहुरजिरा 3, खामगाव शहर : 35, खामगाव तालुका : घाटपुरी 1, लाखनवाडा 2, कुंबेफळ 1, लांजुड 5, लोणी गुरव 3, भालेगाव बाजार 1, शहापूर 7, नांदुरा तालुका : नायगाव 1, जळगाव जामोद शहर : 10, जळगाव जामोद तालुका : जामोद 1, मडाखेड 1 पिंपळगाव काळे 2, आसलगाव 2, बोराळा 1, कुरणगड 1, बुलडाणा शहर : 37, बुलडाणा तालुका : करडी 4, पळसखेड भट 1, पिंपळगाव सराई 1, शिरपूर 1, वरवंड 2, साखळी 4, माळविहीर 1, सुंदरखेड 1, गिरडा 1, कोलवड 1, मोताळा शहर : 3, मोताळा तालुका : रोहिणखेड 2, चिखली शहर : 86, चिखली तालुका : डोंगरशेवली 1, येवता 1, मेरा बुद्रूक 1, असोला नाईक 10, उंद्री 1, काटोडा 2, अमडापूर 3, वरूड 1, मलगी 1, सावरगाव डुकरे 3, अंत्री तेली 1, सातगाव भुसारी 1, खैरव 1, पार्डी 1, अंत्री कोळी 1, शेलगाव आटोळ 1, भोगावती 1, शेलूद 1, येवता 1, गोद्री 1, भानखेड 1, शिंदी हराळी 1, अंत्री खेडेकर 2, शेलगाव जहागीर 1, एकलारा 4, भारज 1, मुंगसरी 1, चांधई 2, बेराळा 1, तेल्हारा 1, सवणा 7, वाघापूर 1, बोरगाव काकडे 2, किन्होळा 4, करतवाडी 1, दिवठाणा 1, देऊळगाव घुबे 1, ब्रह्मपुरी 1, संग्रामपूर तालुका : पातुर्डा 1, सोनाळा 9, टुनकी 1, वानखेड 2, नांदुरा शहर : 23, नांदुरा तालुका : वडनेर 1, जवळा बाजार 1, बेलूरा 1, निमगाव 1, नारखेड 1, सिंदखेड राजा शहर : 22, सिंदखेड राजा तालुका : चंदनपूर 1, सावंगी भगत 1, साखरखेर्डा 5, हिवरखेड पुर्णा 2, मलकापूर शहर : 39, मलकापूर तालुका : तालसवाडा 1, मेहकर तालुका : मोळा 1, जानेफळ 1, कळमेश्वर 9, सारशिव 1, पार्डा 4, गोहेगाव 1, सावत्रा 1, उकळी 1, देऊळगाव माळी 3, मेहकर शहर : 12, लोणार शहर : 5, लोणार तालुका : वढव 1, उऱ्हा 1, पळसखेड 3, सुलतानपूर 1, सावंगी माळी 3, धानोरा 1, पारडा 2, शिवणी पिसा 2, देऊळगाव राजा शहर : 30, देऊळगाव राजा तालुका : डोढ्रा 1, आळंद 1, सिनगाव जहागीर 3, देऊळगाव मही 3, दगडवाडी 1, पिंपळगाव चिलमखा 1, उमरद 1, दगडवाडी 1, अंढेरा 2, निमखेड 1, नागणगाव 2, कुंभारी 1, मूळ पत्ता विव्हळा ता. पातूर जि अकोला 2, नागपूर 1, राजूर ता. बोदवड 1, सिनगाव जि. जालना येथील 1  अशाप्रकारे जिल्ह्यात 579 रूग्ण आढळले आहे

392 रुग्‍णांची कोरोनावर मात

आज 392 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. कोविड केअर सेंटरनुसार सुटी देण्यात आलेले रुग्ण असे ः चिखली : 41, खामगाव : 70, बुलडाणा : सिद्धीविनायक हॉस्पीटल 9, कोविड रूग्णालय 20, स्त्री रुग्णालय 5, अपंग विद्यालय 26, देऊळगाव राजा : 29, मेहकर : 37, जळगाव जामोद : 6, सिंदखेड राजा : 5, नांदुरा : 43, मलकापूर : 56, शेगाव : 24, मोताळा : 18.

3029 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू

आजपर्यंत 152524 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 19168 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 4179 नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण 22400 कोरोनाबाधित रुग्ण असून, सध्या रुग्णालयात 3029 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 203 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.