गुंडाचा टिळकवाडीत धिंगाणा!; घरावर दगडफेक, विवाहितेला अश्लील शिविगाळ, लहान मुलगा दगडफेकीत थोडक्‍यात बचावला!; अनेक तक्रारी देऊनही कारवाई होत नसल्याने गुंडाची वाढली हिंमत!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गुंडाने टिळकवाडीत धिंगाणा घालत एका रहिवाशाच्या घरावर दगडफेक केली. या दगडफेकीतून 5 वर्षीय चिमुकला थोडक्यात बचावला. एवढ्यावर न थांबता या गुंडाने विवाहितेवरही दगडफेक केली. अश्लील शिविगाळ केली. बुलडाणा शहर पोलिसांनी या गुंडाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, वृत्त लिहिपर्यंत त्याला अटक करण्यात आली नव्हती. टिळकवाडीत सुरेंद्र मुरलीधर सोनोने राहतात. त्यांच्या कुटुंबाला …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)  ः गुंडाने टिळकवाडीत धिंगाणा घालत एका रहिवाशाच्‍या घरावर दगडफेक केली. या दगडफेकीतून 5 वर्षीय चिमुकला थोडक्‍यात बचावला. एवढ्यावर न थांबता या गुंडाने विवाहितेवरही दगडफेक केली. अश्लील शिविगाळ केली. बुलडाणा शहर पोलिसांनी या गुंडाविरुद्ध गुन्‍हा दाखल केला असून, वृत्त लिहिपर्यंत त्‍याला अटक करण्यात आली नव्‍हती.

टिळकवाडीत सुरेंद्र मुरलीधर सोनोने राहतात. त्‍यांच्‍या कुटुंबाला शेख सलीम शेख तसलीम (रा. इंदिरानगर) हा गुंड कित्‍येक दिवसांपासून त्रास देत आहे. त्‍याच्‍याविरुद्ध अनेक प्रकरणे न्‍यायप्रविष्ठ असूनही कडक कारवाई होत नसल्याने त्‍याचे धाडस वाढत चालले आहे. काल, 26 मे रोजी सकाळी अकराच्‍या सुमारास शेख सलीम सोनोने यांच्‍या घराजवळ आला व अश्लिल शिवीगाळ करून घरावर त्‍याने दगडफेक सुरू केली. दगडफेकीतून अंगणात असलेला 5 वर्षीय चिमुकला थोडक्‍यात बचावला. सोनोने यांची पत्‍नी सौ. आरती घराबाहेर निघाली असता तिच्यावरही सलीमने दगडफेक केली. त्यानंतर सोनोने बाहेर आले असता त्‍यांच्‍यावरही दगडफेक केली. त्याचबरोबर त्‍याने अश्लील शिवीगाळ सुरू केली. सलीम दररोज सोनोने यांच्‍या घराजवळ येऊन जिवे मारण्याच्या धमक्या व अश्लील शिवीगाळ करतो. त्याच्‍या सततच्या त्रासाने आम्ही कंटाळलो असून, आमचे संपूर्ण कुटुंब दहशतीखाली आल्याचे सोनोने यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्‍हटले आहे. या गुंडामुळे कुटुंबाच्या जिवीताला धोका निर्माण झाला असल्याचेही त्‍यांनी म्‍हटले आहे.

पोलीस कडक कारवाई का करत नाहीत?

यापूर्वी सुध्दा सलीमने या कुटुंबाला अनेकदा त्रास दिला आहे आणि सोनोने यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिले आहेत. तरीही त्‍याच्‍याविरुद्ध कडक कारवाई होत नसल्याने पोलिसांच्‍या भूमिकेवरही संशय निर्माण होत आहे. त्‍यामुळे कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षकांनीच आता यात लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे.