Update : जिल्ह्यात १३५ गुटखा विक्रेत्यांवर कारवाई; १२ लाखांचा गुटखा जप्‍त

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः स्थानिक गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांनी गेले तीन दिवस गुटखामाफियांना सळो की पळो करून सोडले. जिल्ह्यात विविध ठिकाणी छापेमारी केली. यात १३५ गुटखा विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येऊन १२ लाख १४ हजार ५५३ रुपयांचा गुटखा पकडण्यात आला. बुलडाणा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्या आदेशान्वये जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन प्रमुखांनी आपापल्या हद्दीत …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः स्थानिक गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांनी गेले तीन दिवस गुटखामाफियांना सळो की पळो करून सोडले. जिल्ह्यात विविध ठिकाणी छापेमारी केली. यात १३५ गुटखा विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येऊन १२ लाख १४ हजार ५५३ रुपयांचा गुटखा पकडण्यात आला.

बुलडाणा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्या आदेशान्वये जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन प्रमुखांनी आपापल्या हद्दीत तर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बळीराम गिते यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात २२ जून ते २४ जून दरम्यान गुटखा विरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत एलसीबीच्या वेगवेगळ्या पथकांनी नांदुरा, देऊळगाव राजा, बुलडाणा, चिखली, बिबी व साखरखेर्डा पोलीस स्टेशन हद्दीत एकूण ११ ठिकाणी छापे मारले. यात एकूण ६ लाख १६ हजार ५६६ रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला, तर स्थानिक पोलिसांनी त्यांच्या हद्दित केलेल्या १२४ कारवायांमध्ये ५ लाख ९७ हजार ९६७ रुपयांचा गुटखा जप्त केला. या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेच्या सर्वच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

मेहकर तालुक्‍यात दोन छापे

कल्याणा (ता. मेहकर) येथील उद्धव पंढरी गरोळे (38) याच्या घरात गुटखा साठवला असल्याची माहिती गोपनीय सूत्रांकडून “एलसीबी’ला मिळाली होती. काल दुपारी दीडच्या सुमारास त्याच्या राहत्या घरी छापा मारून 50 हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. त्‍याला ताब्यात घेत मेहकर पोलिसांकडे सोपविण्यात आले. दुसरी कारवाई बदनापूर (ता. मेहकर) येथे करण्यात आली. अश्रूबा दादाराव असोले याच्या घरात गुटखा साठवला होता. “एलसीबी’ला याची कुणकुण लागली होती. त्याच्या घरी छापेमारी केली असता गुटख्याचे मोठे घबाड मिळून आले. घरातून 3 लाख 90 हजारांचा गुटखा जप्त करण्यात आला. एलसीबीच्या कारवाईची भणक लागताच आरोपी आसोले मात्र फरार झाला. या कारवाया कर्तव्ययदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे(बुलडाणा), हेमराजसिंह राजपूत (खामगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली “एलसीबी’चे पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांच्या आदेशाने सहायक पोलीस निरिक्षक मनिष गावंडे, पोहेकाँ सुधाकर काळे, पो.ना. संजय नागवे, पोकाँ गणेश शेळके, चालक पो.काँ. सुधाकर बरडे यांनी पार पाडल्या.