गुटखामाफियांविरोधात धडक मोहीम; जिल्हाभर कारवायांचे सत्र; माफिया हादरले!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्हा पोलीस दलाने गुटखामाफियांविरोधात मोहीम उघडली आहे. जिल्हाभर सुरू असलेल्या कारवायांमुळे माफिया हादरले आहेत. काल, 22 जून आणि आज, 23 जूनला बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखा आणि त्या त्या पोलीस ठाण्यांनी कारवाया सुरू केल्या आहेत. नांदुरा, देऊळगावराजा, खामगाव आणि देऊळगावमही येथे या कारवाया करण्यात आल्या.देऊळगाव राजा येथे बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेने …
 
गुटखामाफियांविरोधात धडक मोहीम; जिल्हाभर कारवायांचे सत्र; माफिया हादरले!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्हा पोलीस दलाने गुटखामाफियांविरोधात मोहीम उघडली आहे. जिल्हाभर सुरू असलेल्या कारवायांमुळे माफिया हादरले आहेत. काल, 22 जून आणि आज, 23 जूनला बुलडाणा स्‍थानिक गुन्‍हे शाखा आणि त्‍या त्‍या पोलीस ठाण्यांनी कारवाया सुरू केल्या आहेत. नांदुरा, देऊळगावराजा, खामगाव आणि देऊळगावमही येथे या कारवाया करण्यात आल्या.
देऊळगाव राजा येथे बुलडाणा स्‍थानिक गुन्‍हे शाखेने केलेल्या कारवाईत शेख जावेद शेख गणी (रा. महाराणा प्रतापनगर, देऊळगाव राजा) याला अटक करण्यात आली. तो त्याच्या जावेद किराणा दुकानात गुटखा विकत असल्याची माहिती एलसीबीला मिळाली होती. छाप्‍यात त्याच्या दुकानातून 17 हजार 196 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. त्‍याच्‍याविरुद्ध देऊळगावराजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. देऊळगाव मही (ता. देऊळगाव राजा) येथे देऊळगाव राजा पोलिसांनी कारवाई केली. गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून काल सायंकाळी देऊळगाव मही येथील शेख इरफान शेख गुलाबनबी (29) याच्या पानटपरीची तपासणी केली. त्याच्याकडून 4 हजार 390 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला. देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खामगाव, नांदुरा, चिखली तालुक्‍यात कारवाया
खामगाव शहरातील तलाव रोड सिंधी कॉलनी येथील रहिवासी सुरज घनश्यामदास वाधवाणी याच्या घरी शहर पोलिसांनी छापा मारला. घरझडती घेऊन त्याच्याकडून 44 हजार रुपयांचा गुटखा जप्त करीत खामगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. काल सायंकाळी सव्वासातच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. नांदुरा शहरातील नगर परिषद कॉम्प्लेक्स मधील गायत्री ट्रेडर्स या पानमसाल्याच्या दुकानावर एलसीबीने छापा मारला. या कारवाईत 58 हजार रुपयांचा गुटखा जप्त करून दुकानमालक रवि अलमचंद जुसेजा (45) याच्याविरुद्ध नांदुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. काल दुपारी साडेतीनच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. अमडापूरमध्ये (ता. चिखली) मेहकर रोड भागात पोतडीत गुटखा पुड्यांचे पाकिटे घेऊन विकणाऱ्या साजिद खान नबी खान (40, रा. अमडापूर) याला अमडापूर पोलिसांनी आज सकाळी ताब्‍यात घेतले. त्‍याच्‍याकडून 3040 रुपयांचा माल जप्‍त करण्यात आला. टाकरखेड हेलगा (ता. चिखली) येथेही विकण्यासाठी थैलीतून गुटखा पुड्या घेऊन जाणाऱ्या पंडीत किसन हेलगे (45, रा. टाकरखेड हेलगा) याला काल सायंकाळी ताब्‍यात घेतले. त्‍याच्‍याकडून 2460 रुपयांचा गुटखा जप्‍त करण्यात आला. त्‍याच्‍याविरुद्ध अमडापूर पोलीस ठाण्यात गुन्‍हा दाखल करण्यात आला.

या कारवाया कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे (बुलडाणा), हेमराजसिंह राजपूत (खामगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक बळीराम गीते, देऊळगाव राजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार संभाजी पाटील, खामगाव शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुनील अंबुलकर यांच्या आदेशाने एलसीबीचे सहायक पोलीस निरिक्षक मनीष गावंडे, पोलीस उपनिरिक्षक श्रीकांत जिंदमवार, पोलीस उपनिरिक्षक नीलेश शेळके, पोहेकाँ सुधाकर काळे, पोकाँ युवराज शिंदे, देऊळगाव राजा पोलीस स्टेशनचे नीलेश मोरे, खामगाव शहर पोलीस स्टेशनचे पोहेकाँ गजानन जोशी, नापोकाँ रामेश्वर फासे, पोकाँ गणेश इंगळे, अमडापूर पोलीस ठाण्याचे पोहेकाँ दिलीप तोंडे, पोकाँ दीपक भुतेकर यांनी केली.