“गुप्‍तभेटीं’तून “मनिषा’ पूर्ण करणाऱ्या बाईच्‍या विरोधात चिखलीचे सारे राजकारणी एकवटले!; बैठक घेऊन एल्गार; पण थेट तक्रार द्यायलाही एकही पुढे नाही..!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः एक बाई काय करू शकते, याची अनेक उदाहरणे आपण ऐकत, पाहत अन् त्यावरून आश्चर्य व्यक्त करत असतो. एका बाईच्या नादात पक्के मित्र वैरी झाल्याचेही अनेकदा ऐकिवात येते… पण बाईमुळे चिखलीत वेगळाच कारनामा घडला आहे. झाडून पुसून सारेच राजकारणी एकत्र आले, केवळ तेच नाही तर त्यांच्या जोडीला अगदी व्यावसायिक अन् शहरातील …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः एक बाई काय करू शकते, याची अनेक उदाहरणे आपण ऐकत, पाहत अन्‌ त्‍यावरून आश्चर्य व्‍यक्‍त करत असतो. एका बाईच्या नादात पक्‍के मित्र वैरी झाल्याचेही अनेकदा ऐकिवात येते… पण बाईमुळे चिखलीत वेगळाच कारनामा घडला आहे. झाडून पुसून सारेच राजकारणी एकत्र आले, केवळ तेच नाही तर त्‍यांच्‍या जोडीला अगदी व्यावसायिक अन्‌ शहरातील अन्य प्रतिष्ठित मंडळीही एकवटली… असं काय केलं या बाईने असं तुम्‍हाला वाटणे साहाजिक आहे. तिने केलेले कारनामे (अर्थात तूर्त तरी हे आरोप म्‍हणावेत! कारण कुणाची थेट तक्रार नाही!!) ऐकून तुम्‍हीही चक्रावून जाल… “तिला’ आवर घालण्याची एकमुखी मागणी सर्वपक्षीय नेते, प्रतिष्ठितांनी केली आहे. यासाठी चिखली शहरातील विश्रामगृहावर बैठक घेतली आणि त्‍यानंतर हे सारे मिळून पोलीस ठाण्यात जाऊन ठाणेदारांना साकडे घालून आले… मात्र त्‍यांची कारवाईची “मनिषा’ तूर्त पोलीस तरी पूर्ण करू शकणार नाहीत. कारण थेट तक्रार कुणीच केली नाही आणि निवेदनावर कारवाई करणे कायद्यात बसत नाही..!!

ज्‍या महिलेविरोधात एवढी सारी मंडळी एकवटली ती आहे, ३० वर्षीय महिला… तिने आपल्या “मनिषा’ पूर्ण करण्यासाठी अनेकांना ब्लॅकमेल केल्याचा आराेप आहे. दिग्गज राजकीय नेत्यांसह व्यावसायिक, शिक्षक, प्राध्यापकांकडून तिने लाखो रुपये वसूल केल्याची चर्चा आहे. प्रतिष्ठितांचा मोबाइल नंबर मिळवायचा. “हाय, हॅलो…’ करून दोस्ती करायची. आधी कॉल, नंतर व्हिडिओ कॉल करायचे… भेटायला बोलवायचे आणि गुप्तरित्या झालेल्या भेटीचे व्हिडिओ चित्रिकरण करून नंतर पैशांसाठी ब्लॅकमल करायचे… असा सारा तिचा खेळ! यामुळे अनेकांचे संसार उद्‌ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्याबाहेरील काही नेत्यांनासुद्धा या महिलेने लाखो रुपयांनी गंडवल्याची चर्चा आहे. तिचा त्रास असह्य झाल्याने आज, १३ जुलैला चिखलीतील सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी विश्रामगृहावर बैठक घेतली. त्‍यातील काही पीडितांनी (!) अनुभवही कथन केले. त्यानंतर सर्वांनी चिखलीचे ठाणेदार गुलाबराव वाघ यांची भेट घेतली.

प्रतिष्ठितांना ब्लॅकमेल करणाऱ्या महिलेवर कायदेशीर कारवाई करा, असे निवेदन ठाणेदारांना दिले. मात्र निवेदनावर त्या महिलेच्या केवळ आडनावाचा उल्लेख केल्याने ती महिला कोण? हे गुपितच राहिले. कदाचित थेट तिचे नाव घेतले तर ती आपल्यालाच “हिटलिस्‍ट’वर आणेल अशी भीती यामागे असावी. सर्वपक्षीय बैठकीला माजी आमदार राहुल बोंद्रे, प्रा. नरेंद्र खेडेकर, सतिश गुप्ता, डॉ. प्रतापसिंह राजपूत, अंकुशराव तायडे, कुणाल बोंद्रे, पंडीतराव देशमुख, रामदास देव्हडे, कपिल खेडेकर, रोहित खेडेकर, मदनराजे गायकवाड, प्रा. डॉ. नीलेश गावंडे, ॲड. मंगेश व्यवहारे, प्रशांत ढोरे पाटील, श्रीराम झोरे, रवि तोडकर, गोपाल देव्हडे, गोविंद देव्हडे, दत्ता सुसर, शैलेश बाहेती, शिवराज पाटील, सलिम मेमन, ॲड. राजपाल बडगे, ॲड. प्रशांत देशमुख , नंदू कऱ्हाडे, शिवाजी देशमुख, विनायक सरनाईक, गजानन पवार, प्रतिम गैची, अमोल पुरोहित, अमोल खेडेकर, बंटी लोखंडे, संदीप लोखंडे, संतोष काळे, सचिन बोंद्रे, बंटी कपूर, विलास घोलप, बिट्टू देशमुख, साजीद हुसैन, रितेश पवार, मंगेश ठेंग, गुरुराज बिडवे, नारायण भुजबळ, सुदिप भालेराव, दुष्यंत गायकवाड, दीपक शिंदे आदी सर्वपक्षीय नेते, प्रतिष्ठित उपस्थित होते.

तक्रार दिली तर कारवाई…
प्रतिष्ठितांना ब्लॅकमेल करणाऱ्या महिलेवर कायदेशीर कारवाई करावी असे निवेदन प्राप्त झाले आहे. मात्र हे केवळ निवेदन आहे, तक्रार नाही. या प्रकाराला बळी पडलेल्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यास पुढील कारवाई करता येईल.
– गुलाबराव वाघ, ठाणेदार