गुरुजीसुद्धा फसले… फोन पेवरून भामट्याने लांबवले 92 हजार रुपये!; खामगावातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : आपल्या बँक खाते किंवा ऑनलाइन पेमेंट ॲपची माहिती कुणालाही देऊ नका, असे बँकवाले, पोलीस वारंवार सांगून थकले. पण सुशिक्षित मंडळीही त्याकडे दूर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. खामगावातील एका शिक्षकालाही असाच गंडा घालण्यात आल्याचे समोर आले आहे. पैसे पाठवताना एरर येत असल्याने फोन पेच्या कस्टमर केअरचा नंबर शिक्षकाने गुगलवरून मिळवला. …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) : आपल्या बँक खाते किंवा ऑनलाइन पेमेंट ॲपची माहिती कुणालाही देऊ नका, असे बँकवाले, पोलीस वारंवार सांगून थकले. पण सुशिक्षित मंडळीही त्‍याकडे दूर्लक्ष करत असल्‍याचे दिसून येत आहे. खामगावातील एका शिक्षकालाही असाच गंडा घालण्यात आल्याचे समोर आले आहे. पैसे पाठवताना एरर येत असल्याने फोन पेच्‍या कस्टमर केअरचा नंबर शिक्षकाने गुगलवरून मिळवला. या नंबरवर कॉल केला असता भामट्याने शिक्षकाचे 92 हजार 970 रुपये ऑनलाइन ढापले. याप्रकरणी खामगाव शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रकाश राधाकृष्ण ढवळे (रा. श्यामलनगर, खामगाव) असे फसवले गेलेल्या शिक्षकाचे नाव आहे. टेंभुर्णी (ता. खामगाव) येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत ते शिक्षक आहेत. 15 एप्रिलला त्यांना त्यांच्या सासूबाई बुलडाणा येथे आजारी असल्याने 5000 रुपये पाठवायचे होते. त्यांनी त्यांच्या साल्‍याच्‍या फोन पे अकाउंटवर 5000 रुपये पाठवायचा प्रयत्‍न केला असता पैसे ट्रासन्फर न होता एरर दाखवत होते. त्‍यामुळे त्यांनी गुगलवरून फोन पे कस्टमर केअरचा नंबर काढून मदत मागितली. कस्टमर केअरकडून बोलणाऱ्या राजा राजपूत या व्यक्तीने काही तांत्रिक बाबी ढवळे यांना सांगितल्या व काही कोड नंबर एंटर करायला सांगितले. काही वेळात ढवळे यांच्या खात्यातून 499 रुपये डेबिट झाले. ही बाब ढवळे यांनी फोनवर बोलणाऱ्या राजा राजपूतला सांगितले असता 24 तासांत पैसे जमा होतील असे सांगितले. मात्र थोड्याच वेळात ढवळे यांच्या खात्यातून 33221,33221,22331,2999,199,999 असे एकूण 92 हजार 970 रुपये डेबिट झाले. ढवळे यांनी स्टेट बँकेत जाऊन स्टेटमेंट काढले असता त्यांचे पैसे कमलेश कुमार नावाच्या व्यक्तीच्या खात्यावर ट्रान्सफर झाल्याचे कळले. याप्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी फोन पे कस्टमर केअरचा क्रमांक 7602508975चा धारक व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.