“गुलाब’चा प्रताप! वरुण राजाची लहर; पावसाचा कहर!! घराच्या भिंती ढासळल्या; वाहतूक कैक तास ठप्प

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः “गुलाब’ असे मजेदार तितकेच विचित्र नामकरण करण्यात आलेल्या वादळाच्या प्रभावामुळे जिल्ह्याला वरूणराजाची लहर अन् पावसाचा कहर याचा भीषण अनुभव आला. यामुळे शेतजमीन व पिकांचे अपरिमित नुकसान झाले असतानाच घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड होऊन अनेक मार्गावरील वाहतूक कैक तास ठप्प झाली. सोमवारी वादळी पावसादरम्यान अंगावर वीज पडून खामगाव …
 
“गुलाब’चा प्रताप! वरुण राजाची लहर; पावसाचा कहर!! घराच्या भिंती ढासळल्या; वाहतूक कैक तास ठप्प

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः “गुलाब’ असे मजेदार तितकेच विचित्र नामकरण करण्यात आलेल्या वादळाच्या प्रभावामुळे जिल्ह्याला वरूणराजाची लहर अन्‌ पावसाचा कहर याचा भीषण अनुभव आला. यामुळे शेतजमीन व पिकांचे अपरिमित नुकसान झाले असतानाच घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड होऊन अनेक मार्गावरील वाहतूक कैक तास ठप्प झाली.

सोमवारी वादळी पावसादरम्यान अंगावर वीज पडून खामगाव तालुक्यातील कदमापूर येथील एका गुराख्याचा मृत्यू झाला. निरंजन सरकटे असे या व्‍यक्‍तीचे नाव होय. त्यापाठोपाठ आजही पावसाने कहर सुरूच ठेवला! बुलडाणा तालुक्यातील गिरडा येथील रमेश गायकवाड व रवींद्र गायकवाड या बंधूंच्या घराच्या भिंती कोसळल्या. तसेच भादोला परिसरात 6 घरांच्या भिंती ढासळल्या. यामध्ये भादोला येथील रवींद्र मिसाळ, बोरखेड येथील रवींद्रा धोती, पोखरीमधील पांडुरंग औतकर, संतोष वाघ, गजानन गाडेकर, सरस्वती एकडे यांच्या घराच्या भिंती कोसलल्या. सुदैवाने यात कोणतीही प्राणहानी झाली नाही.

वाहतूक प्रभावित
दरम्यान, पैनगंगा नदीला महापूर आल्याने बुलडाणा- चिखली मार्गावरील वाहतूक आज सकाळपासून ठप्प पडली. यामुळे मालवाहतूक करणाऱ्या जड वाहनापासून ते लहान मध्यम वाहने दुतर्फा अडकली. पुलावरून पाणी वाहत असल्याने रायपूर ते बुलडाणा, पेठनजीकच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली. शेंबा नजीकच्या पुलावरून पानी वाहत असल्याने नांदुरा- मोताळा दरम्यान वाहतूक खोळंबली.