गूड न्यूज: तीन महिन्यांनंतर डिझेल स्वस्त

मुंबई : दररोज इंधन दराच्या बातम्या वाचून पोटात भीतीचा गोळा येणा-या नागरिकांना तीन महिन्यानंतर काहीसा दिलासा मिळाला आहे. देशभर आंदोलनं सुरू असताना आता डिझेल स्वस्त झाले आहे. अर्थात हा दिलासा फार मोठा नाही. पेट्रोलचा भडका उडाला आहे. डिझेल १६ पैशांनी स्वस्त झाले तर पेट्रोल २८ पैशांनी महागले आहे. डिझेलच्या भावात कपात करण्यात आली असली तर …
 

मुंबई : दररोज इंधन दराच्या बातम्या वाचून पोटात भीतीचा गोळा येणा-या नागरिकांना तीन महिन्यानंतर काहीसा दिलासा मिळाला आहे. देशभर आंदोलनं सुरू असताना आता डिझेल स्वस्त झाले आहे. अर्थात हा दिलासा फार मोठा नाही. पेट्रोलचा भडका उडाला आहे.

डिझेल १६ पैशांनी स्वस्त झाले तर पेट्रोल २८ पैशांनी महागले आहे. डिझेलच्या भावात कपात करण्यात आली असली तर पेट्रोलच्या दरातील वाढ कायम आहे. आज पेट्रोल दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. आजच्या दरवाढीने मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०७.२० रुपये झाला आहे, तर दर कपातीने मुंबईत डिझेलचा भाव ९७.२९ रुपये झाला आहे. रविवारी तो ९७.४६ रुपये इतका होता.

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या भावाने ७५ डॉलरची पातळी ओलांडल्यानंतर पेट्रोलियम कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत. कंपन्यांच्या आयात खर्चात वाढ झाली आहे. त्याचा त्याचा भार ग्राहकांवर लादला जात आहे. गेल्या दोन महिन्यांत देशभरात पेट्रोल आणि डिझेलमध्ये मोठी वाढ झाली आहे. देशातील चार प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेल दर सध्या विक्रमी पातळीवर आहे.