गॅस सिलिंडरचा भडका; 18 वर्षीय तरुणीचा पेटून मृत्‍यू

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिचखेड (ता. चिखली) येथे गॅस सिलिंडरचा भडका होऊन 18 वर्षीय तरुणी पेटली. त्यातच जळून तिचा मृत्यू झाला. ही घटना 11 एप्रिलला दुपारी घडली. निकिता मनोज खरात असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. जमिनीवर ठेवलेला गॅस पेटवताच अचानक भडका उडून तिच्या अंगावरील कपड्यांनी पेट घेतला. तिने आरडाओरड सुरू केली. घरातून धूर …
 

चिखली (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)  ः चिचखेड (ता. चिखली) येथे गॅस सिलिंडरचा भडका होऊन 18 वर्षीय तरुणी पेटली. त्‍यातच जळून तिचा मृत्‍यू झाला. ही घटना 11 एप्रिलला दुपारी घडली.

निकिता मनोज खरात असे मृत्‍यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. जमिनीवर ठेवलेला गॅस पेटवताच अचानक भडका उडून तिच्‍या अंगावरील कपड्यांनी पेट घेतला. तिने आरडाओरड सुरू केली. घरातून धूर पाहून जवळच्‍या शेतात काम करणारे तिचे आई-वडील, भाऊ धावत आले. त्‍यांनी तिला बुलडाणा येथील जिल्हा रुग्‍णालयात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने तिला औरंगाबादला हलविण्यात येत असतानाच रस्‍त्‍यात तिचा मृत्‍यू झाला. घटनेची माहिती डिगंबर खरात यांनी अंढेरा पोलिसांना दिली. ठाणेदार राजवंत आठवले यांच्‍या मार्गदर्शनाखाली दुय्यम ठाणेदार मोहन पाटील, बिट अंमलदार मोरसिंग राठोड यांनी घटनास्‍थळी जाऊन पंचनामा केला. या प्रकरणी आकस्‍मिक मृत्‍यूची नोंद करण्यात आली आहे.