गोठ्याला आग लागून शेतकऱ्याचे 65 हजारांचे नुकसान; सिंदखेड राजा येथील घटना

सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दुसरबीडजवळील (ता. सिंदखेड राजा) जऊळका येथील कारभारी निंबाजी मुंढे यांच्या गावाशेजाळीत गोठ्याला आज, 8 मार्चला दुपारी साडेतीनच्या सुमारास अचानक आग लागली. गोठ्यात शेतीअवजारे, जनावरांचा चारा, कुटार होते. ते जळून खाक झाले. ऐन उन्हाळ्यात चारा जळून गेल्याने आता जनावरांना काय खाऊ घालायचे असा प्रश्न शेतकऱ्याला पडला आहे. …
 

सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः दुसरबीडजवळील (ता. सिंदखेड राजा) जऊळका येथील कारभारी निंबाजी मुंढे यांच्‍या गावाशेजाळीत गोठ्याला आज, 8 मार्चला दुपारी साडेतीनच्‍या सुमारास अचानक आग लागली. गोठ्यात शेतीअवजारे, जनावरांचा चारा, कुटार होते. ते जळून खाक झाले. ऐन उन्‍हाळ्यात चारा जळून गेल्याने आता जनावरांना काय खाऊ घालायचे असा प्रश्न शेतकऱ्याला पडला आहे. तहसीलदारांच्‍या आदेशावरून तलाठी यशवंत घरजाळे यांनी तातडीने घटनास्‍थळी धाव घेत पंचनामा केला. यात शेतकऱ्याचे अंदाजे 60 ते 65 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. आगीचे कारण मात्र कळून आले नाही. शेतकऱ्याला लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी ग्रामस्‍थांनी केली आहे.