‘गोडबोले’ ओव्हरफ्लो; शेतकऱ्यांत आनंदीआनंद!

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पिंपळगाव राजा (ता. खामगाव) परिसरात काल रात्री जोरदार पाऊस झाला. त्यामुळे ज्ञानगंगा नदी पहिल्याच पावसात दुथडी भरून वाहत आहे. नदीवरील वसाळी वळतीजवळील गोडबोले बंधारा आज, 9 जूनला ओव्हर फ्लो झाला. त्यामुळे आजूबाजूच्या गावांतील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. बंधाऱ्यामुळे आजूबाजूच्या 8 ते 10 गावांतील शेतीला फायदा होतो. बंधाऱ्यामुळे …
 

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः पिंपळगाव राजा (ता. खामगाव) परिसरात काल रात्री जोरदार पाऊस झाला. त्‍यामुळे ज्ञानगंगा नदी पहिल्याच पावसात दुथडी भरून वाहत आहे. नदीवरील वसाळी वळतीजवळील गोडबोले बंधारा आज, 9 जूनला ओव्हर फ्‍लो झाला. त्‍यामुळे आजूबाजूच्‍या गावांतील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. बंधाऱ्यामुळे आजूबाजूच्या 8 ते 10 गावांतील शेतीला फायदा होतो. बंधाऱ्यामुळे मागील वर्षीपासून विहिरींची पाण्याची पातळी वाढली असून, उन्हाळ्यातही पाण्याची कमतरता शेतीला भासली नाही. परिसरातील शेतकऱ्यांनी मुबलक पाणी असल्याने ऊस व केळी या पिकांकडे लक्ष केंद्रित केले आहे.