गोड बोलून माहेरी पाठवले, आता बायकोचा नंबर Blocked!; विवाहित तरुणीची जळगाव जामोद पोलिसांत धाव, पुण्याच्‍या पतीचा प्रताप!!

जळगाव जामोद (मकसूद शेख ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तुझी तब्येत ठीक नसते. तू माहेरी जाऊन आराम कर, असे म्हणून बायकोला गोड बोलून माहेरी पाठवून दिले. नंतर तिचा फोन उचलणे बंद केले. वारंवार ती संपर्क करत असताना नंतर तिचा नंबर ब्लॉक्ड लिस्टमध्ये टाकला. पुण्याच्या पतीचा हा प्रताप पिंप्री खोदी (ता. जळगाव जामोद) येथील 24 वर्षीय …
 
गोड बोलून माहेरी पाठवले, आता बायकोचा नंबर Blocked!; विवाहित तरुणीची जळगाव जामोद पोलिसांत धाव, पुण्याच्‍या पतीचा प्रताप!!

जळगाव जामोद (मकसूद शेख ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः तुझी तब्‍येत ठीक नसते. तू माहेरी जाऊन आराम कर, असे म्‍हणून बायकोला गोड बोलून माहेरी पाठवून दिले. नंतर तिचा फोन उचलणे बंद केले. वारंवार ती संपर्क करत असताना नंतर तिचा नंबर ब्‍लॉक्‍ड लिस्‍टमध्ये टाकला. पुण्याच्‍या पतीचा हा प्रताप पिंप्री खोदी (ता. जळगाव जामोद) येथील 24 वर्षीय विवाहितेने जळगाव जामाेद पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून समोर आला आहे.

सौ. स्वाती राजेश निंबोळकर (रा. गौतमनगर, पुणे, ह. मु. पिंप्री खोद्री ता.जळगाव जामोद) हिने वडील साहेबराव वाढे यांच्‍यासोबत येऊन पोलिसांत तक्रार दिली,की तिचे लग्‍न 21 एप्रिल 2019 रोजी मलकापूर येथील मराठा मंगल कार्यालयात झाले होते. लग्नानंतर तिचे पती राजेश पुंडलिक निंबोळकर यांनी दोन महिने चांगले वागवले. मात्र नंतर त्‍यांनी “तू नोकरी कर..’ असा तगादा लावला. “”तुम्ही मला वेळ द्या. मी नोकरीवर लागेल.” असे विवाहितेने त्‍यांना सांगितले. मात्र सासू सौ. अनुसया पुंडलिक निंबोळकर, सासरे पुंडलिक तुळशीराम निंबोळकर व नणंद सौ. प्रियंका नितीन चिमकर यांनीसुद्धा नोकरी करण्याबद्दल तगादा लावणे सुरू केले.

12 ऑक्‍टोबर 2019 रोजी तिच्‍या पतीने तिला सांगितले, की तू तुझ्या वडिलांना बोलावून घे. तुझी तब्येत बरोबर नसते. तू नेहमी आजारी पडते. तू माहेरी जा व तेथेच आराम कर. एवढ्यावरच न थांबता तिच्‍या पतीने तिच्‍या वडिलांना पुण्याला बोलावून घेतले. ती वडिलांसोबत पिंप्री खोद्री येथे आली. तेव्हापासून ती पिंप्री खोद्री येथेच राहतेय. त्यानंतर तिने जेव्हा केव्हा पतीला कॉल केला तेव्हा पती बोलत नव्हता. त्‍याने फोन उचलणे बंद केले. वारंवार कॉल करत असल्याने तिचा नंबर ब्‍लॉक्‍ड केला, असे तिने तक्रारीत म्‍हटले आहे. त्‍यावरून जळगाव जामोद पोलिसांनी तिच्‍या पतीसह सासू, सासरा, नणंदेविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.