गोपाळ देव्हडेंचा खोटेपणा उघड; कोअर कमिटीने पाडले तोंडघशी!

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखली नगरपालिका विषय समितीच्या सभापती पदासाठी नगरसेवक गोपाळ देव्हडे यांच्या नावाची कोणतीही चर्चाच झाली नसल्याने त्यांना सभापती पद देण्याचा विषयच शिल्लक राहत नसल्याने गोपाळ देव्हडे यांनी केलेले वक्तव्य धांदात खोटे आणि दिशाभूल करणारे असल्याचे भाजप कोअर कमिटीने प्रसिद्धीपत्रक काढून सांगितले आहे.चिखली नगरपालिकेच्या विषय समित्यांच्या सभापती पदासाठी 18 जानेवारीला कोअर कमिटीची …
 

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखली नगरपालिका विषय समितीच्या सभापती पदासाठी नगरसेवक गोपाळ देव्हडे यांच्या नावाची कोणतीही चर्चाच झाली नसल्याने त्यांना सभापती पद देण्याचा विषयच शिल्लक राहत नसल्याने गोपाळ देव्हडे यांनी केलेले वक्तव्य धांदात खोटे आणि दिशाभूल करणारे असल्याचे भाजप कोअर कमिटीने प्रसिद्धीपत्रक काढून सांगितले आहे.
चिखली नगरपालिकेच्या विषय समित्यांच्या सभापती पदासाठी 18 जानेवारीला कोअर कमिटीची बैठक झाली होती. त्या बैठकीत नगर परिषदेच्या विषय समितीच्या निवडणुकीच्या संदर्भात आमदार सौ. श्‍वेताताई महाले पाटील, सतीश  गुप्त, विजय कोठारी, डॉ. प्रतापसिंह राजपूत, रामकृष्ण दादा शेटे, रामदास देव्हडे, पंडितदादा देशमुख हे कोअर कमिटी सदस्य उपस्थित होते. या कोअर कमिटीच्या झालेल्या बैठकीत सौ. विमलताई देव्हडे, सौ. ममताताई बाहेती, सौ. हंसाबाई आतार, विजय नकवाल या नगरसेवकांना सभापती बनविण्याचे ठरले होते. त्यामुळे गोपाळ देव्हडे यांनी कोअर कमिटीने त्यांच्या नाव सभापती पदासाठी निश्‍चित केले हा दावा खोटा आहे. तसेच त्यांनी विविध माध्यमांना जाहीर स्टेटमेंट दिले. त्यात त्यांनी त्यांचे नाव निश्‍चित केल्याचे म्हटले होते. परंतु त्यांनी दिलेले वक्तव्य खोटे आणि दिशाभूल करणारे आहे.