गौरव ढाब्यावर वारंवार छापे तरी अवैधरित्या दारूविक्री सुरूच!; पाठबळ कुणाचे?; एलसीबीचा दुसऱ्यांदा छापा; 76 हजारांची देशी-विदेशी दारू जप्त!

देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः देऊळगाव राजा-जालना बायपासवरील गौरव ढाब्यावर बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेने दुसऱ्यांदा कारवाई करत काल, 27 मे रोजी अवैधरित्या विक्री होणारी 76 हजार रुपयांची देशी-विदेशी दारू जप्त केली. ढाबामालकाला अटक करून त्याच्याविरुद्ध देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वीही एलसीबीने या ढाब्यावर 12 एप्रिलला छापा मारून 25,940 रुपयांचा …
 

देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः देऊळगाव राजा-जालना बायपासवरील गौरव ढाब्यावर बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेने दुसऱ्यांदा कारवाई करत काल, 27 मे रोजी अवैधरित्या विक्री होणारी 76 हजार रुपयांची देशी-विदेशी दारू जप्त केली. ढाबामालकाला अटक करून त्याच्याविरुद्ध देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वीही एलसीबीने या ढाब्यावर 12 एप्रिलला छापा मारून 25,940 रुपयांचा साठा जप्त केला होता. एकदा कारवाई होऊनही पुन्हा अवैधरित्या दारूविक्री हिंमत येण्यासाठी पाठबळ कुणाचे मिळते, याची चर्चा आता देऊळगाव राजात होत आहे.
हॉटेल गौरव ढाबा येथे अवैध दारू विक्री होत असल्याची कुणकुण एलसीबीला खबऱ्यांनी दिली होती. त्यानुसार पथकाने छापा मारला असता 76 हजार 60 रुपयांची दारू जप्त करण्यात आली. याप्रकरणी हॉटेल मालक मोहसीन खान मंजूर खान (34, रा. वॉर्ड क्र.1, प्रतापनगर देऊळगाव राजा) याच्याविरुद्ध देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांच्या आदेशाने सहायक पोलीस निरिक्षक मनिष गावंडे, पोहेकाँ सुधाकर काळे, पो.ना. सुनील खरात, पो.ना. संजय नागवे, पो.ना. दीपक पवार, पोकाँ गणेश शेळके, चालक पोकाँ संजय मिसाळ यांनी केली.