ग्रामपंचायतींना डेप्‍युटी सीईंओंचे ‘हे’ आवाहन!

आर. आर. पाटील सुंदर गाव स्पर्धेत सहभाग घ्यावाबुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शासनाच्या ग्राम विकास विभागाने आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजना जाहीर केलेली आहे. या योजनेकरिता कालबद्ध कार्यक्रम निश्चित करून देण्यात आलेला आहे. त्यासाठी 10 जून 2021 ते 31 डिसेंबर 2021 कालबद्धता निश्चित केलेली आहे. या योजनेतंर्गत प्रत्येक पंचायत समितीमधील एका ग्रामपंचायतीला …
 
ग्रामपंचायतींना डेप्‍युटी सीईंओंचे ‘हे’ आवाहन!

आर. आर. पाटील सुंदर गाव स्पर्धेत सहभाग घ्यावा
बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः
शासनाच्या ग्राम विकास विभागाने आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजना जाहीर केलेली आहे. या योजनेकरिता कालबद्ध कार्यक्रम निश्चित करून देण्यात आलेला आहे. त्यासाठी 10 जून 2021 ते 31 डिसेंबर 2021 कालबद्धता निश्चित केलेली आहे. या योजनेतंर्गत प्रत्येक पंचायत समितीमधील एका ग्रामपंचायतीला तालुका सुंदर गाव म्हणून घोषित करण्यात येते. या ग्रामपंचायतीला 10 लाख रुपये तसेच जिल्हा सुंदर ग्रामपंचायतीला 40 लाख रुपयांचे पारितोषिक प्राप्त होणार आहे. सुरुवातीला योजनेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या ग्रामपंचायतींनी 20 जून 2021 पर्यंत स्वमूल्यांकन अहवाल पंचायत समितीला सादर करावयाचा आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) जिल्हा परिषद, बुलडाणा यांनी केले आहे.