ग्रामपंचायतीची धुसफूस अजून जाईना…मतदान केले नाही म्‍हणून एकाला पाईपने झोडले!!; खामगाव तालुक्‍यातील घटना

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः निवडणूक होऊन अडीच महिने लोटले तरी अजून गावातील धुसफूस काही शमलेली नाही. मतदान केले नाही म्हणून एकाला पाईपने झोडपून काढत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना शेलोडी (ता. खामगाव) येथे व 5 एप्रिलला दुपारी 12.30 वाजता घडली. सागर संजय राऊत (रा. शेलोडी) असे मारहाण झालेल्याचे नाव असून, त्याला सुनील …
 

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः निवडणूक होऊन अडीच महिने लोटले तरी अजून गावातील धुसफूस काही शमलेली नाही. मतदान केले नाही म्‍हणून एकाला पाईपने झोडपून काढत लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केल्याची घटना शेलोडी (ता. खामगाव) येथे व 5 एप्रिलला दुपारी 12.30 वाजता घडली.

सागर संजय राऊत (रा. शेलोडी) असे मारहाण झालेल्याचे नाव असून, त्‍याला सुनील पुंजाजी इंगळे,  बंडू भगवान इंगळे व सुधाकर भगवान इंगळे (सर्व रा शेलोडी) यांनी मारहाण केली. राऊत हे त्यांच्या घराजवळ उभे होते. तेव्‍हा सुनील, बंडू व सुधाकर हे त्‍याच्‍याकडे आले. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मला मतदान का केले नाही असे म्हणून सुनीलने पाईपने त्‍यांना डाव्या दंडावर व दोन्ही पायांवर बेदम मारहाण केली. तिघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली व जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. दरम्‍यान, या प्रकरणात परस्‍पविरोधी तक्रारही दाखल झाली असून, सौ. चंद्रकलाबाई सुनील इंगळे यांच्‍या तक्रारीवरून सागर संजय राऊत आणि राहुल अर्जुन मोरे यांच्‍याविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. पास पोलीस अंमलदार देवराव धांडे करत आहेत.