ग्रामपंचायत निवडणुकीत पाजणार होते विदेशी दारू!; उत्पादन शुल्क विभागामुळे फसला प्लॅन; 1 लाखाचा मद्यसाठा जप्त

बुलडाणा (अजय राजगुरे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः केवळ दादरा व नगर हवेली या केंद्र शासित प्रदेशांत विक्रीसाठी परवानगी असलेली विदेशी दारू चोरून लपून मोताळा तालुक्यात आणणार्या दोघांच्या मुसक्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने आवळल्या आहेत. त्यांच्या ताब्यातून 1 लाखाची विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई 30 डिसेंबरला करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क विभागाने …
 

बुलडाणा (अजय राजगुरे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः केवळ दादरा व नगर हवेली या केंद्र शासित प्रदेशांत विक्रीसाठी परवानगी असलेली विदेशी दारू चोरून लपून मोताळा तालुक्यात आणणार्‍या दोघांच्या मुसक्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने आवळल्या आहेत. त्यांच्या ताब्यातून 1 लाखाची विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई 30 डिसेंबरला करण्यात आली.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने आज प्रसिद्धीस दिलेल्या वृत्तात म्हटले आहे, की ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने अवैध विक्रीसाठी ही दारू जिल्ह्यात आणली गेली असावी. मात्र वेळीच गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, संचालक सौ. उषा वर्मा, विभागीय उपायुक्त मोहन वर्दे, बुलडाण्याचे अधीक्षक अतुल कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक एन. एल. शिंदे, निरिक्षक डी. आर. शेवाळे यांच्यासह पथकातील दुय्यम निरिक्षक अमित आडळकर, प्र. दुय्यम निरिक्षक प्रकाश मुंगडे, जवान एन. ए. देशमुख, ए. पी. तिवाने, पी. ई. चव्हाण, आर. ए. कुसळकर, आर. एच. सोभागे, व्ही. पी. पाटील, ए. एम. सोळंके, एम. एस. जाधव यांनी मोताळा तालुक्यातील दाभाडी व माकोडी शिवारात छापा मारला. या ठिकाणी दीपक वासुदेव खर्चे (36, रा. दाभाडी) व सुधाकर वामन फेंगडे (70, रा. माकोडी) यांच्या ताब्यातून विदेशी दारूचा मद्यासाठा जप्त केला. यात इम्पेरिअल ब्ल्यु व्हिस्की 180 मिलीच्या 250 बाटल्या, मॅकडाऊन नं.1 व्हिस्की 180 मि.ली.च्या 384 बाटल्या, मॅकडॉल रमच्या 750 मिलीच्या 17 बाटल्या व देशी दारूच्या 180 मिलीच्या 21 बाटल्या असा एकूण 1 लाख 2 हजार 542 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींना अटक करण्यात आली आहे. इतर संशयितांचा शोध घेणे सुरू आहे. तपास निरिक्षक नितीन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.