ग्रामपंचायत शिपायाच्‍या घरावर डल्ला!; संग्रामपूर तालुक्‍यातील घटना

संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ग्रामपंचायत शिपायाच्या घरातून पाकिट चोरून 24 हजार 200 रुपये चोरट्याने लांबवल्याची घटना काल, 24 मे रोजी सकाळी जस्तगाव (ता. संग्रामपूर) येथे समोर आली. या प्रकरणी तामगाव पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सतिष चंद्रभान डोसे (38) यांचे घरातच किराणा दुकान आहे. ते त्यांची पत्नी पाहते. काल सकाळी 8 च्या सुमारास …
 

संग्रामपूर (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः  ग्रामपंचायत शिपायाच्‍या घरातून पाकिट चोरून 24 हजार 200 रुपये चोरट्याने लांबवल्याची घटना काल, 24 मे रोजी सकाळी जस्‍तगाव (ता. संग्रामपूर) येथे समोर आली. या प्रकरणी तामगाव पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.

सतिष चंद्रभान डोसे (38)  यांचे घरातच किराणा दुकान आहे. ते त्‍यांची पत्‍नी पाहते. काल सकाळी 8 च्‍या सुमारास त्‍यांची पत्‍नी सौ. ज्योती घराच्या गच्चीवर असताना त्‍यांना शेजारी गोरखनाथ गजानन जाधव यांच्‍या गच्चीवर सासऱ्याचे वडिलांचे पैसे ठेवण्याचे पाकिट दिसले. त्‍यांनी सतिष यांना बोलावून घेत पाकिट दाखवले. पाकिट रिकामे होते. डोसे यांनी घरातील कपाटाची पाहणी केली व वडिलांना विचारपूस केली असता त्यांनी पाकिटात ठेवलेले 8200 रुपये, ज्‍योती यांच्‍या पर्समधील 4000 रुपये व चोरखान्यात ठेवलेले 12000 रुपये असे एकूण 24200 रुपये चोरट्यांनी चोरून नेल्याचे दिसून आले. मध्यरात्री 12 ते सकाळी 8 च्‍या दरम्यान चोरट्याने घरात प्रवेश करून कपाट उघडून पैशांची चोरी केल्याचे डोसे यांनी तक्रारीत म्‍हटले आहे. पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत.