ग्रामरोजगार सेवकाच्या आत्महत्येप्रकरणी पत्नीची पोलीस स्टेशनला तक्रार; म्हणाली, तहसीलमधील महिला डेटा ऑपरेटरने छळले!

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ग्राम रोजगार सेवक रामेश्वर ढोरे यांनी राहत्या घरातील बाथरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २७ जुलै रोजी कव्हळा (ता. चिखली) येथे समोर आली होती. याप्रकरणी आज, २९ जुलैला मृतकाची पत्नी संगीता ढोरे यांनी अमडापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. चिखली तहसील कार्यालयात कार्यरत असणाऱ्या एका महिला डेटा ऑपरेटरच्या धमकी कंटाळून …
 

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ग्राम रोजगार सेवक रामेश्वर ढोरे यांनी राहत्या घरातील बाथरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २७ जुलै रोजी कव्हळा (ता. चिखली) येथे समोर आली होती. याप्रकरणी आज, २९ जुलैला मृतकाची पत्नी संगीता ढोरे यांनी अमडापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. चिखली तहसील कार्यालयात कार्यरत असणाऱ्या एका महिला डेटा ऑपरेटरच्या धमकी कंटाळून पतीने आत्महत्या केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

चिखली तहसील कार्यालयातील रोजगार हमी योजना कक्षातील डेटा ऑपरेटरने माझे पती रामेश्वर ढोरे यांना नेहमी अपमानास्पद वागणूक दिली व मस्टरवर सही करा, नाहीतर तुमचा रिपोर्ट करते, अशा धमक्‍या दिल्या. या धमकीला कंटाळून माझ्या पतीने आत्महत्या केली, असे तक्रारीत म्‍हटले आहे. यासंदर्भात अमडापूर पोलीस स्टेशन चे ठाणेदार नागेश चतरकर यांच्याशी संपर्क केला असता या तक्रारीची चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.