ग्रामस्‍थांनी हिवरा खुर्दचे मोबाइल टॉवर केले बंद!; शॉक लागून मृत्‍यू झाल्याचे प्रकरण

मेहकर (अनिल मंजुळकर ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः इंडूस कंपनीच्या उपद्व्यापामुळे 29 जूनला कामगाराचा हकनाक बळी गेला. त्यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी मृतकाच्या कुटुंबियांना न्याय मिळत नाही तोपर्यंत या कंपनीचे मोबाइल टॉवर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. मोबाइल टॉवरचे रोहित्र बदलण्याचे काम करत असताना दत्तात्रय वाकळे या कामगाराचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला होता. या प्रकरणी मृतकाच्या नातेवाइकांनी …
 

मेहकर (अनिल मंजुळकर ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः इंडूस कंपनीच्‍या उपद्‌व्यापामुळे 29 जूनला कामगाराचा हकनाक बळी गेला. त्‍यामुळे संतापलेल्या ग्रामस्‍थांनी मृतकाच्‍या कुटुंबियांना न्याय मिळत नाही तोपर्यंत या कंपनीचे मोबाइल टॉवर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.

मोबाइल टॉवरचे रोहित्र बदलण्याचे काम करत असताना दत्तात्रय वाकळे या कामगाराचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला होता. या प्रकरणी मृतकाच्या नातेवाइकांनी जानेफळ पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. महावितरण कंपनीला न कळवताच इंडूस कंपनीने परस्पर रोहित्र बदलण्याचे काम चालवले होते. ग्रामस्‍थांनी आज, 1 जुलैला मोबाइल टॉवर बंद करून घटनेचा निषेध नोंदवला. यावेळी सरपंचपती रमेश खरात, उपसरपंच अशोक शिंदे, ग्रा.पं. सदस्य रवींद्र शेळके, सुनिल शेळके, माधवराव दळवी, माधवराव दहिभाते, संजय उतपुरे, राजेंद्र उतपुरे, विजय खरात, सुरेश वाकळे, भिमराव विघ्ने, नंदू वाकळे आदी उपस्थित होते.