ग्रामीण भागातील चाचण्या वाढविण्यावर ‘चिंतन’ बैठकीत भर, ‘बुलडाणा लाइव्ह’ने वेधले होते लक्ष

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात वेगाने फोफावणाऱ्या कोरोनाला रोखण्यासाठी संभाव्य उपाययोजनांवर विचारविनिमय करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व आरोग्य यंत्रणांची बैठक आज, 15 मार्चला पार पडली. याबाबत बुलडाणा लाईव्हने सातत्याने वृत्त प्रसारित करून प्रशासन व आरोग्य यंत्रणांचे लक्ष वेधले होते. या वृत्तांचे प्रतिबिंब या बैठकीत देखील पडले. जिल्हाधिकारी एस. राममूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्याच्‍या कानाकोपऱ्यात वेगाने फोफावणाऱ्या  कोरोनाला रोखण्यासाठी संभाव्य उपाययोजनांवर विचारविनिमय करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व आरोग्य यंत्रणांची बैठक आज, 15 मार्चला पार पडली. याबाबत बुलडाणा लाईव्हने सातत्याने वृत्त प्रसारित करून प्रशासन व आरोग्य यंत्रणांचे लक्ष वेधले होते. या वृत्तांचे प्रतिबिंब या बैठकीत देखील पडले.

जिल्हाधिकारी एस. राममूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांची विशेष उपस्थिती होती. जिल्ह्यात कोरोना झपाट्याने वाढत आहे. रोज कोरोना बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. हा आकडा 25 हजारांपर्यंत पोहोचला आहे. त्याला नियंत्रणात आणण्यासाठी चर्चा विनिमय करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने आरोग्य विभागातील सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीत जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचा वेग वाढविणे, तेराही तालुक्यांतील ग्रामीण भागातील कोरोना टेस्ट वाढविण्यावर भर देण्याच्या सूचना देण्यात आल्याचे डॉ. तडस यांनी बैठकीनंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले.