ग्राम पंचायतींच्या दिमतीला 427 वाहनांचा ताफा! सव्वादोनशे एसटी बसचा समावेश

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी) ः येत्या 15 जानेवारीला होऊ घातलेली 527 ग्रामपंचायतींची निवडणूक सुरळीतपणे पार पाडण्यासाठी प्रशासन व यंत्रणांच्या दिमतीला तब्बल 427 लहान मोठ्या वाहनांचा ताफा सज्ज राहणार आहे. यामध्ये एसटी महामंडळाच्या 217 बसचा समावेश आहे. सव्वापाचशे ग्रामपंचायत निवडणुकांचे प्रशासकीय संचालन करणे व त्या सुरळीत पार पाडणे एक मोठे आव्हानच आहे. यामुळे सर्वच आवश्यक घटकांचे सुसज्ज …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी) ः येत्या 15 जानेवारीला होऊ घातलेली 527 ग्रामपंचायतींची निवडणूक सुरळीतपणे पार पाडण्यासाठी प्रशासन व यंत्रणांच्या दिमतीला तब्बल 427 लहान मोठ्या वाहनांचा ताफा सज्ज राहणार आहे. यामध्ये एसटी महामंडळाच्या 217 बसचा समावेश आहे.

सव्वापाचशे ग्रामपंचायत निवडणुकांचे प्रशासकीय संचालन करणे व त्या सुरळीत पार पाडणे एक मोठे आव्हानच आहे. यामुळे सर्वच आवश्यक घटकांचे सुसज्ज नियोजन करण्यात येत आहे. निवडणूक पूर्व कामकाज, मतदान ते मतमोजणीपर्यंत 13 तहसील व जिल्हा प्रशासनास आवश्यक वाहनांची जुळवाजुळव हा त्यातील महत्त्वाचा एक भाग ठरावा, यासाठी प्रभारी जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, आरडीसी दिनेश गीते व उप जिल्हाधिकारी (भूसंपादन) भूषण अहिरे यांच्या मार्गदर्शनात वाहतूक आराखडा तयार करण्यात आला आहे, यासाठी तपशीलवार नियोजन जिल्हा कचेरीचे श्याम ढोले, गजानन गोरे, रवी सरोदे, रंजना होगे, सीमा शेळके यांनी केले. यानुसार 12 ते 21 जानेवारी या कालावधीकरिता विविध विभागांच्या सुस्थितीतील वाहने अधिग्रहित करण्यात आली आहे. याशिवाय एसटी महामंडळाच्या 217 बस व खासगी 3 मिनीबसची सेवा घेण्यात येणार आहे. याशिवाय एआरटीओ दराने 151 जीप, टाटा सुमो आदी गाड्या भाड्याने घेण्यात येत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावरील निवडणूक साहित्य, मतदान साहित्य, निवडणूक अधिकारी, कर्मचारी, क्षेत्रीय अधिकारी यांची अचूक व सुरळीत वाहतूक करणे शक्य होणार आहे. तहसीलच्या मागणीप्रमाणे त्यांना वाहने पुरविण्यात येणार आहेत.