ग गुरुजीचा… भ भ्रष्टाचाराचा… गुरुजीच्‍या अनोख्या शाळेने चक्रावले बीडीओ!; जळगाव जामोदमध्ये गुन्‍हा दाखल

जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सर्व शिक्षा अभियानांतर्गत मंजूर झालेल्या शाळा खोलीच्या बांधकामात भ्रष्टाचार करून 1 लाख 60 हजार रुपयांच्या निधीचा अपहार केल्या प्रकरणी एका शिक्षकाविरुद्ध जळगाव जामोद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संतोष नारायण गव्हांदे (सह अध्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, धाम, ता. जळगाव जामोद) असे गुन्हा दाखल झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी …
 

जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः सर्व शिक्षा अभियानांतर्गत मंजूर झालेल्या शाळा खोलीच्या बांधकामात भ्रष्टाचार करून 1 लाख 60 हजार रुपयांच्या निधीचा अपहार केल्या प्रकरणी एका शिक्षकाविरुद्ध जळगाव जामोद पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे. संतोष नारायण गव्हांदे (सह अध्यापक, जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळा, धाम, ता. जळगाव  जामोद) असे गुन्हा दाखल झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी जळगाव जामोद पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

तक्रारीनुसार जिल्हा परिषद प्राथमिक  शाळा रसलपूर (ता. जळगाव जामोद) या शाळेला सन 2014 -2015 या वर्षात सर्व शिक्षा अभियानांर्गत  एक शाळा खोली मंजूर झाली होती. त्यावेळी तत्कालीन मुख्याध्यापक मुकूंद शंकर भटकर यांनी तब्येतीच्या कारणास्तव  मुख्याध्यापक पदाचा प्रभार हा सहअध्यापक संतोष नारायण गव्हांदे याच्‍याकडे दिला होता. तेव्हा पंचायत समिती कार्यालयास यासंदर्भात कळवलेसुद्धा नव्हते. गव्हांदे याने शाळा खोलीसाठी आलेला निधी टप्प्याटप्याने विड्रॉल करून शाळा खोलीचे अर्धवट बांधकाम केले. याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अभियंता आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत गव्हांदे याने 1 लाख 60 हजार 760 रुपयांचा अपहार केल्याचे समोर आले होते. त्यामुळे त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले होते. त्यावरून पंचायत समितीचे गटशिक्षण  अधिकारी नारायण जगदेवराव फाळके यांच्या तक्रारीवरून आज, 9 एप्रिलला जळगाव जामोद पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.