घरखर्चाकरिता माहेरहून 10 हजार रुपये आण म्‍हणून विवाहितेचा इतका छळ केला की तिने गळफास घेतला!; मेहकर तालुक्‍यातील घटना

मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः घरखर्चासाठी माहेरवरून 10 हजार रुपये घेऊन ये असे म्हणून सासरच्यांनी विवाहितेचा छळ मांडला. या छळाला कंटाळून तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी विवाहितेच्या भावाने डोणगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पतीसह सासरच्या 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सौ. सीमा गजानन राठोड (30, रा. कनका बुद्रूक, ता.मेहकर) असे आत्महत्या …
 

मेहकर (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः घरखर्चासाठी माहेरवरून 10 हजार रुपये घेऊन ये असे म्‍हणून सासरच्यांनी विवाहितेचा छळ मांडला. या छळाला कंटाळून तिने गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली. या प्रकरणी विवाहितेच्‍या भावाने डोणगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पतीसह सासरच्‍या 7 जणांविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे.

सौ. सीमा गजानन राठोड (30, रा. कनका बुद्रूक, ता.मेहकर) असे आत्‍महत्‍या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तिने 3 मे रोजी सकाळी 7 पूर्वी आत्‍महत्‍या केली होती. या प्रकरणी प्रकाश सोमा आडे (रा. वाघजाळी ता. बार्शीटाकळी जि.अकोला) यांच्‍या तक्रारीवरून सीमाचा पती गजानन हिरामन राठोड, सासू सौ.गयाबाई हिरामन राठोड, सासरा हिरामन राठोड (सर्व रा. कनका बुद्रूक), नणंद अनिता विष्णू जाधव (रा. पाथर्डी, ता. मेहकर), नणंद सुनिता राजू चव्हण, नंदोई राजू चव्हाण, आकाश राजू चव्हण (सर्व रा. बेलगाव, ता. मेहकर) यांच्‍याविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. सासरच्यांनी चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करत तिला घर खर्चासाठी माहेरवरून 10,000 रुपये घेऊन येण्यास सांगितले. पैसे आणून दिले नाही म्हणून तिचा मानसिक व शारीरिक छळ सुरू केला. या छळास कंटाळून गळफास घेऊन तिने आत्महत्या केली. तपास पोलीस उपनिरिक्षक शिवाजी राठोड करत आहेत.