घरचे शेतात जाताच तरुणी घरातून निघून गेली!; खामगाव तालुक्‍यातील घटना, दोन दिवसांत ४ तरुणी बेपत्ता

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आई-वडील व भाऊ शेतात कामासाठी गेले असताना १९ वर्षीय तरुणी घरातून निघून गेल्याची घटना खामगाव तालुक्यातील टाकळी विरो येथे २७ जुलैला घडली. या प्रकरणी काल, १ ऑगस्टला तिच्या वडिलांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दिली. कीर्ती कैलास शेगोकार (रा. टाकळी विरो) असे बेपत्ता झालेल्या तरुणीचे नाव असून, ती २७ जुलैला …
 

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आई-वडील व भाऊ शेतात कामासाठी गेले असताना १९ वर्षीय तरुणी घरातून निघून गेल्याची घटना खामगाव तालुक्‍यातील टाकळी विरो येथे २७ जुलैला घडली. या प्रकरणी काल, १ ऑगस्‍टला तिच्‍या वडिलांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दिली.

कीर्ती कैलास शेगोकार (रा. टाकळी विरो) असे बेपत्ता झालेल्या तरुणीचे नाव असून, ती २७ जुलैला दुपारी साडेबाराच्‍या सुमारास कोणाला काही न सांगा निघून गेली. तिचा गावात, नातेवाइकांकडे सगळीकडे शोध घेतला. मात्र ती मिळून आली नाही. रंग गोरा, बांधा सडपातळ, उंची पाच फूट पाच इंच, अंगात लाल फुले असलेला कुर्ता, पिवळसर पैजामा, पायात प्लास्टिक चप्पल असे तिचे वर्णन आहे. कुणाला ती आढळल्‍यास तपास अधिकारी पोहेकाँ सुपडासिंग चव्हाण यांच्‍याशी मो. नं. 9423447307 या क्रमांकावर संपर्क करावा.

घाटपुरीतून युवक बेपत्ता

घाटपुरी (ता. खामगाव) येथील पिंपळगाव राजा रोडवरील रहिवासी विनोद काशिराम तायडे (३८) हा युवक गायब झाला आहे. त्‍याचे वडील काशिराम तायडे यांनी तो हरवल्याची तक्रार पोलिसांत दिली. १२ जुलैला सकाळी साडेनऊच्‍या सुमारास विनोद घराबाहेर फिरण्यासाठी गेला. तो नंतर परतलाच नाही. त्याचा खामगाव व आजूबाजूच्या परिसरात, नातेवाइकांकडे सगळीकडे शोध घेतला मात्र तो मिळून आला नाही. तो गतिमंद असून, घरगुती उपचार करण्यात आले होते. तो नेहमी बाहेर गेल्यानंतर ८ ते १० दिवस घरी येत नव्‍हता. त्‍यामुळे त्‍याची वाट पाहण्यात आली. अखेर तो हरवल्याची तक्रार देण्यात आली. उंची ५.२ इंच, रंग सावळा, बांधा सडपातळ, तोतरा बोलतो, अंगात चाॅकलेटी फुलबाह्याचा टी-शर्ट, निळी नाइट पँट असे त्‍याचे वर्णन आहे. तो कुणाला आढळल्‍यास तपास अधिकारी नापोकाँ प्रदीप मोठे यांच्‍याशी मो. नं. 8308926811 वर संपर्क करावा.

दोन दिवसांत ४ बेपत्ता
गेल्या दोन दिवसांत तीन तरुणी आणि एक तरुण बेपत्ता झाल्याची नोंद पोलीस ठाण्यांत करण्यात आली आहे. यात बुलडाणा शहरातील चिखली रोडवरील मोठी देवी मंदिर परिसरात राहणारी रूतुजा संदीप गायकवाड (१९) हरवल्याची तक्रार बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. प्रियांका लक्ष्मण राणे (१९, खरबडी, ता. मोताळा) ही तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार बोराखेडी पोलिसांत करण्यात आली आहे. जळगाव जामोद शहरातील लाडनापूस वेस भागातील शीतल देवानंद पारवे (२०) ही तरुणी गायब झाल्याची तक्रार जळगाव जामोद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. वरवट बकाल (ता. संग्रामपूर) येथील शेख इकबाल (३१) हा घरातून निघून गेला असून, तो हरवल्याची तक्रार तामगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. खामगाव तालुक्‍यातील अंत्रज फाटा येथून २२ वर्षीय सौ. प्रज्ञा अमोल वानखेडे ही विवाहिला बेपत्ता झाल्याची तक्रार खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.