घरफोडीतील दोन चोरट्यांना अटक, धाडसी आजीपुढे चोरटेही झाले होते हतबल; मलकापुरातील घटना

मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मोठ्या चोरीच्या इराद्याने घरात घुसलेल्या चोरट्यांनी आजीच्या मानेला चाकू लावून दागिने आणि पैसे कुठे ठेवले आहेत, याची विचारणा केली होती. पण धाडसी आजीने त्यांच्या धमकीला न घाबरता उत्तरे दिली होती.. त्यांच्या या धाडसापुढे चोरटेही हतबल झाले होते आणि त्यांनी त्यांच्या गळ्यातील पोत व 2 मोबाइल घेऊन पळ काढला होता. 24 …
 

मलकापूर (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः मोठ्या चोरीच्‍या इराद्याने घरात घुसलेल्या चोरट्यांनी आजीच्‍या मानेला चाकू लावून दागिने आणि पैसे कुठे ठेवले आहेत, याची विचारणा केली होती. पण धाडसी आजीने त्‍यांच्‍या धमकीला न घाबरता उत्तरे दिली होती.. त्‍यांच्‍या या धाडसापुढे चोरटेही हतबल झाले होते आणि त्‍यांनी त्‍यांच्‍या गळ्यातील पोत व 2 मोबाइल घेऊन पळ काढला होता. 24 ऑक्‍टोबरच्‍या मध्यरात्री ही घटना घडली होती. या प्रकरणातील दोन चोरट्यांना पकडण्यात मलकापूर शहर पोलिसांना यश आले असून, त्‍यांच्‍या ताब्‍यातून 8 ग्रॅमची सोन्‍याची पोत किंमत 30 हजार) व रेडमी कंपनीचे 2 मोबाइल असा एकूण 36 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

श्रीमती मंगला सुधाकर देशमुख यांनी या प्रकरणात मलकापूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्‍यावरून पोलिसांनी गुन्‍हा दाखल करत तपास सुरू केला होता. तपासात रोहित सुभाष दीपके व ओम अमोल भालशंकर (रा. शिवाजीनगर, मलकापूर) यांनी चोरी केल्याचे समोर आल्याने पोलिसांनी त्‍यांच्‍या मुसक्‍या आवळल्‍या.

पोलीस ठाण्यापासून हाकेच्‍या अंतरावर घडली होती घटना

विशेष म्‍हणजे धाडसी चोरीची घटना ज्‍या घरात घडली ते घर पोलीस ठाण्यापासून हाकेच्‍या अंतरावर आहे. त्‍यामुळे पोलिसांनाच एकप्रकारे चोरट्यांनी आव्‍हान दिले होते. त्‍यामुळे पोलिसांनीही हे आव्‍हान स्‍वीकारत चोरट्यांना पकडलेच, अशी चर्चा आता होत आहे.