घरफोडी अन् दुचाकी चोरणारे दोघे जळगाव जामोदमध्ये जेरबंद!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जळगाव जामोद तालुक्यात उसरा गावात घरफोडी अन् दोन मोटारसायकल चोरणार्या दोन चोरट्यांना बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) काल, 11 फेब्रुवारीला रात्री उशिरा अटक केली. मालसिंग नानसिंग बहेलिया (30 रा. जळगाव जामोद) आणि अरुण रुमसिंग जमरा (25, रा. कहुपट्टा ता. जळगाव जामोद) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.तीन महिन्यांपूर्वी चोरट्यांनी जळगाव …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जळगाव जामोद तालुक्यात उसरा गावात घरफोडी अन् दोन मोटारसायकल चोरणार्‍या दोन चोरट्यांना बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) काल, 11 फेब्रुवारीला रात्री उशिरा अटक केली. मालसिंग नानसिंग बहेलिया (30 रा. जळगाव जामोद) आणि अरुण रुमसिंग जमरा (25, रा. कहुपट्टा ता. जळगाव जामोद) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
तीन महिन्यांपूर्वी चोरट्यांनी जळगाव जामोद तालुक्यातील उसरा गावात एका बंद घरात चोरी केली होती. तसेच जळगाव जामोद शहरातून दोन मोटारसायकल सुद्धा चोरल्या होत्या. त्यांनी चोरलेल्या मोबाईलपैकी एक मोबाइल चोरटे वापरत असून ते जळगाव जामोद पोलीस स्टेशनच्या हद्दीत असल्याची खात्रीलायक गोपनीय माहिती एलसीबीला मिळाली होती. मिळालेल्या माहितीवरून दोघांना ताब्यात घेतल्यावर त्यांनी केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून एक मोबाईल आणि एक दुचाकी जप्त केली असून, पुढील कार्यवाहीसाठी चोरट्यांना जळगाव जामोद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत (खामगाव), अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे (बुलडाणा) यांच्या मार्गदर्शनाखाली आणि एलसीबीचे पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांच्या आदेशाने सहायक पोलीस निरिक्षक नागेशकुमार चतरकर, पोलीस उपनिरिक्षक नीलेश शेळके, ना.पो.काँ. दीपक पवार, संजय नागवे, पो.काँ. नदिम शेख, विजय सोनोने, चालक पो.काँ. सुरेश भिसे, सायबर पो.स्टे.चे राजू आडवे, पो.काँ. कैलास ठोंबरे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.