घरमालकिनीचा विनयभंग; आधी भाडेकरू महिलेनेही केली हाेती अशीच तक्रार; बुलडाण्यातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः रूम खाली करून द्या, असे सांगितल्याने भाडेकरूने घरमालकीन महिलेला जातीवाचक शिवीगाळ करून व वाईट उद्देशाने उजवा हात पकडून विनयभंग केला. शहर पोलिसांनी परशराम सातव (रा. राजेश्वरनगर, सागवन, बुलडाणा) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याचप्रकणात काल भाडेकरूच्या पत्नीनेही विनयभगांची तक्रार दिली होती. शहर पोलिसांनी घरमालकिनीचा पुतण्या सचिन पारवे याला अटक केली …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः रूम खाली करून द्या, असे सांगितल्याने भाडेकरूने घरमालकीन महिलेला जातीवाचक शिवीगाळ करून व वाईट उद्देशाने उजवा हात पकडून विनयभंग केला. शहर पोलिसांनी परशराम सातव (रा. राजेश्वरनगर, सागवन, बुलडाणा) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याचप्रकणात काल भाडेकरूच्‍या पत्‍नीनेही विनयभगांची तक्रार दिली होती. शहर पोलिसांनी घरमालकिनीचा पुतण्या सचिन पारवे याला अटक केली होती. घरमालकीन महिलेने तक्रार दिली, की परशराम सातव हा त्यांच्या घरात भाड्याने राहताे. नेहमी शिवीगाळ करतो. 2 आठवड्यांपूर्वी त्याला रुम खाली करायला सांगितले होते. 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 7:30 वाजता घरमालकीन व पुतण्या दोघांनी मिळून खोली खाली करून द्या, असे म्हटल्यावर परशरामने घरमालकिनीला रस्त्यावर येऊन जातीवाचक शिवीगाळ केली व वाईट उद्देशाने हात पकडत जीवे मारण्याची धमकी दिली.