घरमालक बाहेरगावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी फोडले घर!; बुलडाण्याच्‍या चेतनानगरातील घटना

बुलडाणा (अजय राजगुरे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बाहेरगावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी चेतनानगरात घर फोडले. घरमालक अजून घरी परतले नाहीत त्यानंतरच चोरीचा निश्चित आकडा समोर येऊ शकतो. या प्रकरणी घरमालकिनीच्या भाच्याने बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. त्यावरून चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना काल, 8 मे रोजी दुपारी समोर आली. चेतनानगरात …
 

बुलडाणा (अजय राजगुरे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः बाहेरगावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी चेतनानगरात घर फोडले. घरमालक अजून घरी परतले नाहीत त्‍यानंतरच चोरीचा निश्चित आकडा समोर येऊ शकतो. या प्रकरणी घरमालकिनीच्‍या भाच्याने बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. त्‍यावरून चोरट्याविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. ही घटना काल, 8 मे रोजी दुपारी समोर आली.

चेतनानगरात सौ. उषा पांडुरंग राठोड राहतात. त्‍यांच्‍या मुलगा गोंदियात आरोग्‍य अधिकारी आहे. त्‍याचे नुकतेच लग्‍न झाले असून, नववधूसह त्‍यांचे सामान गोंदियाला पोहोचविण्यासाठी उषाबाई, त्‍यांचे पती गोंदियाला काल सकाळी आठच्‍या सुमारास गेले होते. मात्र उषाबाईंना कंपाऊंडला कुलूप लावले नसल्याचे लक्षात आले. त्‍यांनी त्‍यांचा भाचा संकेत गणेश चव्‍हाण (रा. चेतनानगर) याला सांगितले. संकेत कुलूप लावण्यासाठी गेला असता त्‍याला घराचा दरवाजा उघडाच दिसला. दरवाजाचे कुलूपही सोफ्‍यावर पडलेले दिसले. लोखंडी आलमारीही उघडी दिसली. त्‍यातील दागिने गायब आहेत. चोरीची रक्‍कम उषाबाई घरी आल्यानंतरच कळेल. संकेतने बुलडाणा शहर पोलीस ठाणे गाठून चोरीची तक्रार दिली आहे. एएसआय नामदेव खवले तपास करत आहेत.