घरातच बनवले गुटख्याचे गोडावून; शेगाव पोलिसांनी लाखाचा माल केला जप्त, दोघांच्‍या आवळल्‍या मुसक्‍या

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः घरातच गुटख्याचे गोडावून बनवून तब्बल लाख रुपयांचा माल साठवून ठेवणाऱ्या दोघांच्या मुसक्या शेगाव शहर पोलिसांनी आवळल्या. हा गुटखा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई आज, 17 एप्रिलला शेगाव शहरातील लखपती गल्ली आणि मटकरी गल्लीत करण्यात आली.पोलीस उपनिरिक्षक योगेशकुमार दंदे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार लखपती गल्लीतील रहिवासी सौरभ …
 

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः घरातच गुटख्याचे गोडावून बनवून तब्‍बल लाख रुपयांचा माल साठवून ठेवणाऱ्या दोघांच्‍या मुसक्‍या शेगाव शहर पोलिसांनी आवळल्‍या. हा गुटखा जप्‍त करण्यात आला आहे. ही कारवाई आज, 17 एप्रिलला शेगाव शहरातील लखपती गल्ली आणि मटकरी गल्लीत करण्यात आली.
पोलीस उपनिरिक्षक योगेशकुमार दंदे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार लखपती गल्लीतील रहिवासी सौरभ कमलकिशोर टिबडेवाल (29) याच्‍या घरावर छापा मारण्यात आला. या ठिकाणी 57 हजार 375 रुपयांचा गुटखा माल जप्त करण्यात आला. त्‍यानंतर मटकरी गल्लीतील चंपालाल ओंकारदास राठी (51) याच्‍या घरावर छापा मारून पोलिसांनी 44 हजार 871 रुपयांचा गुटखा जप्‍त केला. दोन्‍ही कारवाईत 1 लाख 20 हजार 246 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोन्‍ही आरोपींविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत (खामगाव), उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी यांच्‍या मार्गदर्शनाखाली ठाणेदार एस. आर. ताले यांच्‍या नेतृत्त्वात पोलीस उपनिरिक्षक योगेशकुमार दंदे, एएसआय लक्ष्मण मिरगे, पोना. गणेश वाकेकर, उमेश बोरसे, पोकाँ विजय साळवे, हरिचंद बालवाल यांनी केली. तपास श्री. दंदे करत आहेत.

दुचाकीवरून गुटख्याची वाहतूक, खामगावात दोघांना पकडले

काल, 16 एप्रिलच्‍या पहाटे दीडच्या सुमारास विना नंबरच्या दुचाकीवरून गुटख्याच्या दोन पोतड्या घेऊन जाणाऱ्या दोघांना पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून 69760 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी यांनी केली. मयूर हरगोविंद शर्मा (29, रा. सराफा, खामगाव), श्याम मख्खनलाल तिवारी (48, रा. किसाननगर, खामगाव) अशी आरोपींची नावे आहेत. दोन जण दुचाकीवर पोतड्यात गुटखा घेऊन येत असल्याची गोपनीय माहिती उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यावरून त्यांनी पथकाला नाकेबंदीचे आदेश दिले होते. पहाटे दीडच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात शेगावकडून आरोपी एका विना नंबरच्या दुचाकीवर दोन पोतड्या घेऊन येताना दिसले. पोलिसांनी त्यांना पकडले व पोतड्यांची तपासणी केली असता त्यात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला विविध कंपन्यांचा प्रतिबंधित गुटखा आढळला. पोलिसांनी दुचाकीसह प्रतिबंधित गुटखा असा 69, 760 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत खामगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.