घरात करमत नाही म्‍हणून बाहेर फिरतोय… पोलिसांशी हुज्जत!; नांदुरा शहरातील घटना

नांदुरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मला घरात करमत नाही म्हणून बाहेर फिरतोय. तुम्ही विचारणारे कोण, असे पोलिसांनाच विचारून हुज्जत घालणाऱ्या 24 वर्षीय तरुणाविरुद्ध नांदुरा पोलिसांनी गुन्हा दाखल करत ताब्यात घेतले आहे. योगेश सुरेश इंगळे ( रा. मिलिंदनगर, नांदुरा) असे या तरुणाचे नाव आहे. तो काल 13 मे रोजी रात्री 11 वाजता डॉ. आंबेडकर चौकात फिरत …
 

नांदुरा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः मला घरात करमत नाही म्‍हणून बाहेर फिरतोय. तुम्‍ही विचारणारे कोण, असे पोलिसांनाच विचारून हुज्जत घालणाऱ्या 24 वर्षीय तरुणाविरुद्ध नांदुरा पोलिसांनी गुन्‍हा दाखल करत ताब्‍यात घेतले आहे. योगेश सुरेश इंगळे ( रा. मिलिंदनगर, नांदुरा) असे या तरुणाचे नाव आहे. तो काल 13 मे रोजी रात्री 11 वाजता डॉ. आंबेडकर चौकात फिरत होता. पो.काँ. अमोल बळीराम राऊत सहकाऱ्यांसह पेट्रोलिंग करत असताना तो विनामास्‍क मिळून आला. स्वतःला व इतरांना कोरोना विषाणूचा संसर्ग होईल असे घातक कृत्य  केल्याने त्याच्‍याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.