घरात घुसून १५ वर्षीय मुलीचा विनयभंग; खामगाव तालुक्‍यातील घटना

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः घरात घुसून १५ वर्षीय मुलीचा विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार खामगाव तालुक्यातील पिंप्राळा येथे समोर आला आहे. मुलीच्या तक्रारीवरून खामगाव ग्रामीण पोलिसांनी आज, ३ ऑगस्टला दुपारी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शांताराम हरिश्चंद्र पेसोडे (रा. पिंप्राळा) असे आरोपीचे नाव आहे. २९ जुलैला सकाळी ११ च्या सुमारास अल्पवयीन मुलगी घरात पलंगावर एकटीच …
 
घरात घुसून १५ वर्षीय मुलीचा विनयभंग; खामगाव तालुक्‍यातील घटना

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः घरात घुसून १५ वर्षीय मुलीचा विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार खामगाव तालुक्‍यातील पिंप्राळा येथे समोर आला आहे. मुलीच्‍या तक्रारीवरून खामगाव ग्रामीण पोलिसांनी आज, ३ ऑगस्‍टला दुपारी तरुणाविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.

शांताराम हरिश्चंद्र पेसोडे (रा. पिंप्राळा) असे आरोपीचे नाव आहे. २९ जुलैला सकाळी ११ च्‍या सुमारास अल्पवयीन मुलगी घरात पलंगावर एकटीच बसलेली होती. त्‍याचवेळी शांतारामने तिच्‍या घरात घुसून वाईट उद्देशाने तिचा हात धरला. मुलीने त्‍याच्‍या हाताला झटका देत दुसऱ्या खोलीत पळाली. यावेळी त्‍याने ही बाब कुणाला सांगितली तर तुला पाहून घेईल, अशी धमकी दिली. मुलीने आरडाओरड केल्‍याने तो तिथून पळून गेला. तिने आज पोलिसांत तक्रार दिली. तपास पोलीस उपनिरिक्षक योगेश धोत्रे करत आहेत.