घरासमोरच ओट्यावर बसून विकत होता दारू… पोलिसांनी पकडून शिकवला धडा!; अमडापूर येथील घटना

अमडापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः घरासमोरील ओट्यावर दारू विकण्यासाठी बसलेल्या 42 वर्षीय व्यक्तीला अमडापूर पोलिसांनी रंगेहात पकडले. ही कारवाई काल, 9 एप्रिलला सायंकाळी साडेसहाच्या सुमारास करण्यात आली. त्याच्याकडून 270 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. फकीरा वामण निकाळजे (42, रा. इंदिरानगर, अमडापूर, ता.चिखली) असे पकडण्यात आलेल्या दारूविक्रेत्याचे नाव आहे. पोलीस सूत्रांनी सांगितले, की 9 एप्रिलला एएसआय …
 

अमडापूर (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः घरासमोरील ओट्यावर दारू विकण्यासाठी बसलेल्या 42 वर्षीय व्‍यक्‍तीला अमडापूर पोलिसांनी रंगेहात पकडले. ही कारवाई काल, 9 एप्रिलला सायंकाळी साडेसहाच्‍या सुमारास करण्यात आली. त्‍याच्‍याकडून 270 रुपयांचा मुद्देमाल जप्‍त केला आहे.

फकीरा वामण निकाळजे (42, रा. इंदिरानगर, अमडापूर,  ता.चिखली) असे पकडण्यात आलेल्या दारूविक्रेत्‍याचे नाव आहे. पोलीस सूत्रांनी सांगितले, की 9 एप्रिलला एएसआय लक्ष्मण टेकाळे व मपोकाँ रुपाली सरकटे हे खासगी मोटारसायकलने पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत होते. अमडापूर येथून जात असताना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की एक व्‍यक्‍ती अमडापूर येथे त्याच्‍या घरासमोर ओट्यावर वायरच्‍या थैलीत देशी दारू विकत आहे. त्‍यामुळे पोलिसांनी पंचांसमक्ष त्‍याला रंगेहात पकडले. त्‍याच्‍याकडे 90 मि.ली.च्या देशी दारूच्‍या 10 बाटल्‍या (किंमती 260रुपये) व एक वायर थैली (किंमती 10 रु) असा एकूण 270 रुपयांचा माल मिळून आला.